मुंबई

नालासोपारा पुन्हा चर्चेत

CD

तीन लाख मतदारांवर फुली
नालासोपाऱ्यातील सर्वाधिक नावे यादीतून वगळली
वसई, ता. ३ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील नालासोपारा विधानसभेतील तीन लाख सहा हजार ९२१ हजार मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत वगळली गेली आहेत. याबाबतची यादी माहिती महाराष्ट्र मुख्य निवडणूक कार्यालयाने प्रसिद्ध केली असून, पत्त्यांवर नसलेल्या मतदारांचा आकडा सर्वाधिक आहे.
पालघर जिल्ह्यातील नालासोपारा शहरात सर्वाधिक मतदारसंख्या आहे. त्यामुळे प्रशासनाने पुनरीक्षण प्रक्रियेला वेग दिला होता. मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षण प्रक्रियेपूर्वी प्रशासनाने जनजागृती केली. वसई, नालासोपारा मतदारसंघात बीएलओ नेमण्यात आले. प्रशासनाने मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी मोहीम सुरू केली. यादीत आपले नाव समाविष्ट करता यावे, यासाठी केंद्रावर मतदारांच्या रांगादेखील लागल्याचे दिसून आले. २००२ च्या विधानसभेची नाव, यादी क्रमांक पडताळणी करण्यात आली. पुनरीक्षणापूर्वी नालासोपारा मतदारसंघात सहा लाख ६३ हजार मतदार होते. पण पुर्नरीक्षणात निम्मी नावे वगळली आहेत. त्यामुळे कधी काळी सर्वाधिक मतदार असलेले नालासोपारा शहर मतदारांची संख्या घटल्याने चर्चेत आहे.
--------------------------
भविष्यातील निवडणुकांमध्ये चुरस
- वसई-विधानसभा मतदारसंघात तीन लाख ५४ हजार ९०८ मतदार आहेत. यापैकी ४९ हजार १६८ मतदार वगळले गेले आहेत. नालासोपारा, वसई मतदारसंघात १० लाखांहून अधिक मतदार होते.
- त्यापैकी चार लाख नावे वगळल्याने पुन्हा किती जणांची नावे यादीत समाविष्ट होतील, हे प्रक्रिया पूर्ण झाल्यावर स्पष्ट होईल. मात्र तोपर्यंत निवडणुकांमध्ये कोणत्या राजकीय पक्षाला फायदा होणार, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
------------
मुख्य कारणे
दुबार नोंदणी
- मॅपिंग करताना २००२ मध्ये मतदार यादीत नाव महत्त्वाचे होते; मात्र अनेकांना नाव सापडले नाही. घरचे पत्ते सापडले नाहीत. अनेक जण स्थलांतरित झाले, काहींनी पुनरीक्षण प्रकियेत सहभाग घेतला नाही. तर अनेकांनी इतर ठिकाणी नोंदणी केल्याने दुबार नोंदणीची नावे कमी झाली.
-------------------
भाडेकरूंचे स्थलांतर
नालासोपारा परिसरात उत्तर भारतीय तसेच कोकणवासीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विविध समाजांतील नागरिक कामानिमित्त येथील लोकवस्तीत भाडेकरू म्हणून वास्तव्य करीत आहेत. तर पश्चिम भागात पूर्वापार राहणारी स्थानिक लोकवस्ती आहे. त्यामुळे २०१७ साली मतदान केल्याने नावे कमी झाली होती.
----------------------
मतदार यादी पडताळणी
पत्त्यावर न सापडले - २,५६,८३७
कायम स्थलांतरित - २८,५०१
मृत मतदार - ११,७७३
इतर ठिकाणी नोंदणी - ४,३६१
इतर करणे - ५,३६९
-----------
नालासोपारा विधानसभेत मतदार यादीत पत्ते पूर्ण नसल्याने लोक आढळून आले नाहीत. मात्र मतदारांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. ६ नंबरचा फॉर्म भरून घ्यावा. त्यानंतर पडताळणीनंतर यादीत नाव समाविष्ट केले जाईल.
- शेखर घाडगे, मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी, वसई

लेकीची मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका, नेत्याला मंत्रिपद गमावण्याची वेळ

Curtly Ambrose : त्याने विकेट घेतली की आई घराबाहेर घंटा वाजवायची! २१ व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केलेला तो जगातील महान गोलंदाज बनला

Koyana Dam : महाराष्ट्रासह कर्नाटकातील कृष्णाकाठला मोठा दिलासा! कोयना धरण शंभर टक्के भरले, १०५.२५ टीएमसी पाणीसाठा पूर्ण

Life Horoscope: दीर्घायुष्य लाभलेल्या असतात ‘या’ राशीच्या व्यक्ती; आयुष्यात कितीही त्रास आला तरी लढण्याची ताकद कायम, तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates: एक दोन चपाटी मारणे म्हणजे हल्ला करणं नसतं- आनंद दवे

SCROLL FOR NEXT