मुंबई

निम्मे रस्त्यांवर मंडपांचा कब्जा!

CD

उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) : गणेश मंडळांकडून उल्हासनगरसह आजूबाजूच्या शहरात मंडपांसाठी नियम धाब्यावर बसवले जात आहेत. अनेक ठिकाणी मंडळांनी निम्म्याहून अधिक रस्ता व्यापला आहे. आधीच वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त असताना आता या अडथळ्यांचा सामना करावा लागणार असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संताप व्यक्त होत आहे.

उल्हासनगर आणि आजूबाजूच्या शहरांत सार्वजनिक; तसेच घरगुती गणेशोत्सवांची संख्या दरवर्षी वाढत आहे. दुसरीकडे वाढते नागरीकरण, वाहनांची प्रचंड संख्या, रस्त्यांच्या दुतर्फा पार्किंग आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे शहरातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीचा ताण आहे. त्यातच गणेशोत्सवासाठी मैदाने किंवा मोकळ्या जागांचा अभाव असल्याने अनेक सार्वजनिक मंडळांकडून रस्त्यांवर मंडप उभारले जात आहेत. मात्र, काही मंडळांनी नागरिकांच्या रहदारीचा विचार न करता नियमबाह्य पद्धतीने निम्म्याहून अधिक रस्ता व्यापल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या १५ दिवस आधीच मंडप उभारणी सुरू होते, तर उत्सव संपल्यानंतरही काही ठिकाणी आठवडाभर मंडप हटवले जात नाहीत. त्यामुळे जवळपास महिनाभर नागरिक आणि वाहनचालकांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो. सायंकाळच्या गर्दीच्या वेळी या मंडपांमुळे परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परवानगी देणाऱ्या पोलिस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निदर्शनास ही बाब असूनही वेळीच कारवाई का केली जात नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा; मात्र रस्त्यांवर मंडप उभारताना नियमांचे उल्लंघन करून रहदारीला अडथळा निर्माण करणे योग्य नाही. या संदर्भात आयुक्त, मुख्याधिकारी, पोलिस आणि मंडळांच्या अध्यक्षांची संयुक्त बैठक घेतली जाईल. नियमबाह्य पद्धतीने रस्ता अडवून मंडप उभारणाऱ्या मंडळांची पाहणी करून त्यांच्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल.
- सचिन गोरे, पोलिस उपायुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकीची मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका, नेत्याला मंत्रिपद गमावण्याची वेळ

Curtly Ambrose : त्याने विकेट घेतली की आई घराबाहेर घंटा वाजवायची! २१ व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केलेला तो जगातील महान गोलंदाज बनला

Koyana Dam : महाराष्ट्रासह कर्नाटकातील कृष्णाकाठला मोठा दिलासा! कोयना धरण शंभर टक्के भरले, १०५.२५ टीएमसी पाणीसाठा पूर्ण

Life Horoscope: दीर्घायुष्य लाभलेल्या असतात ‘या’ राशीच्या व्यक्ती; आयुष्यात कितीही त्रास आला तरी लढण्याची ताकद कायम, तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates: एक दोन चपाटी मारणे म्हणजे हल्ला करणं नसतं- आनंद दवे

SCROLL FOR NEXT