मुंबई

वृक्षांचे जतन करणे व पडझड रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेची विशेष मोहीम

CD

वृक्षसंवर्धनासाठी नवी मुंबई महापालिकेची विशेष मोहीम
नेरूळ, ता. ३ (बातमीदार) : नवी मुंबईतील वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी आणि पावसाळ्यात होणारी झाडांची पडझड रोखण्यासाठी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नुकतेच महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. नव्या रस्त्यांवर वृक्षारोपणासाठी जागा राखीव ठेवण्यासोबतच सध्या अस्तित्वात असलेल्या वृक्षांच्या मुळांभोवती केलेले काँक्रीटीकरण, डांबरीकरण आणि पेव्हर ब्लॉक हटवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
पावसाळ्यात वृक्ष पडण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची बैठक झाली असून, त्यात मुळांभवतीचे काँक्रीटीकरण, विकासकामात मुळांची छाटणी, वृक्षांचे एका बाजूला झुकणे, अशास्त्रीय छाटणी आणि परदेशी प्रजातींची लागवड ही प्रमुख कारणे आढळली. यानुसार आयुक्तांनी २४ मीटरपेक्षा अधिक रुंद रस्त्यांवर दर १० मीटरवर एक आणि सहा ते बारा मीटर रुंदीच्या रस्त्यांवर दर २० मीटरवर एक वृक्ष असणे अपेक्षित आहे. वृक्षांभोवती काँक्रीट, डांबर व पेव्हर ब्लॉक हटवून किमान एक मीटर मोकळी जागा ठेवावी. मोठ्या वृक्षांसाठी दीड मीटरची जागा ठेवण्याची व्यवस्था करण्याच्या आदेश दिले आहेत.

परवानगी बंधनकारक
विकासकामांमुळे वृक्षांच्या मुळांना किंवा बुंध्याला इजा होऊ नये, यासाठी खोदकाम उद्यान सहाय्यकांच्या नियंत्रणाखाली करावे. संबंधित विभागाने वृक्ष अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. वृक्ष तोडणे किंवा स्थलांतरित करणे आवश्यक असल्यास वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

स्थानिक प्रजातींची लागवड
नवीन वृक्षलागवड करताना स्थानिक प्रजातींना प्राधान्य द्यावे. वृक्षांची छाटणीही शास्त्रीय पद्धतीने करून त्यांचा समतोल राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नियम मोडल्यास कारवाई
वृक्षाला इजा पोहोचवल्यास किंवा विनापरवानगी वृक्षतोड केल्यास संबंधित विभागाला जबाबदार धरले जाणार आहे. संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व जतन अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकीची मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका, नेत्याला मंत्रिपद गमावण्याची वेळ

Curtly Ambrose : त्याने विकेट घेतली की आई घराबाहेर घंटा वाजवायची! २१ व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केलेला तो जगातील महान गोलंदाज बनला

टिटवाळ्यातील कामामुळे आंबिवलीत प्रवासी रखडले, स्टेशन मास्टर कार्यालयात प्रवाशांनी घातला गोंधळ

Life Horoscope: दीर्घायुष्य लाभलेल्या असतात ‘या’ राशीच्या व्यक्ती; आयुष्यात कितीही त्रास आला तरी लढण्याची ताकद कायम, तुमची रास कोणती?

Egg Freezing & Future Fertility: आई-वडिल होण्यासाठी अंडी फ्रीज करण्याचा विचार करताय? आधी ‘या’ ४ गोष्टी समजून घ्या

SCROLL FOR NEXT