विविध रूपांतील गणेशमूर्तींनी सजले स्टॉल
बुकिंगसाठी होतेय गर्दी...
वाशी, ता. ३ बातमीदार : गणेशोत्सवाला आता काही दिवसच शिल्लक असल्याने नवी मुंबई शहरातील विविध भागांत गणेशमूर्तींनी स्टॉल सजले आहेत. नागरिकांकडून आपल्या लाडक्या गणरायाच्या मूर्तीचे बुकिंग करण्यासाठी गर्दी होताना दिसत आहे. यावर्षी गणेशमूर्तींमध्येही विविधता पाहायला मिळत आहे. आकर्षक रंगसंगती, विविध आकार आणि पारंपरिक तसेच आधुनिक स्वरूपातील गणेशमूर्ती नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. जास्वंदीच्या फुलांमध्ये बसलेली, फेटा बांधलेली, घोड्यावर बसलेली, साधूच्या वेशातील वीणा वाजविणारी, पार्वतीच्या मांडीवर बसलेली, मोरावर स्वार असलेली, संत तुकाराम महाराजांच्या वेशातील, गिटार वाजविणार, मुषकावर विराजमान, मोदकावर बसलेली, पाठावर, पाळण्यात, नंदीबैलावर, स्वामी समर्थांच्या रूपात, विठ्ठलाच्या रूपात, बालाजीच्या रूपात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात अशा विविध रूपांतील मूर्ती उपलब्ध आहेत.
यावर्षी शहरात लवकर स्टॉल लागल्यामुळे मूर्तींची निवड करण्यासाठी नागरिकांना मोठा अवधी मिळणार आहे. गणेशोत्सवाच्या महिनाभर आधीच भक्तांना गणेशोत्सवाचे वेध लागले असून, सध्या घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मूर्तींचे बुकिंग सुरू झाले आहे. दरवर्षीपेक्षा यंदा शहरात नावीन्यपूर्ण गणेशमूर्ती दाखल झाल्या आहेत. मूर्ती तयार करताना मातीचे उपरणे, धोतर, शेला, फेटा अशा स्वरूपातील वस्त्रांचा वापर करून त्यांना आकर्षक रंगरंगोटी केली जात आहे. यामुळे कापडी पोशाखातील गणेशमूर्तींनाही ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत आहे. शहरात राजस्थानच्या कलाकारांनी घडविलेल्या मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या मूर्ती स्वस्त असल्यामुळे नागरिकांचा त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शहरातील विविध स्टॉल्सवर गणेशमूर्ती खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. मूर्तींची किंमत आकारानुसार दोन हजार रुपयांपासून १५ हजार रुपयांपर्यंत आहे. मूर्तींसाठी विविध रंगारी, खडे, कुंदन व टिकल्यांचा वापर करून सुंदर पोशाख तयार केला जात आहे. काही मूर्तींना उपरणे, टोपी, शाल, शेला अशा कापडी वस्त्रांनी सजविण्यात आले असून, त्यामुळे मूर्ती अधिक आकर्षक दिसत आहेत. यंदा गणेशमूर्तींच्या विविध आकर्षक रूपांमुळे नागरिकांना आपल्या आवडीची मूर्ती निवडण्याचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. गणेशोत्सव जवळ येत असल्याने आगामी दिवसांत मूर्ती बुकिंग आणि खरेदीसाठी गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे मूर्तिकार सुनील मोरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.