कल्याण, ता. ३ (बातमीदार) : शहराच्या पूर्वेतील खडेगोळवली परिसरातील मंगेशी संस्कार सोसायटीच्या बाजूला असलेल्या १०० फूट रस्त्यावरील पुलावर व नाल्यात काही चिकन-मटण विक्रेत्यांकडून मृत कोंबड्या फेकल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या अस्वच्छतेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
मंगेशी संस्कार संकुलात सुमारे २६७ सदनिका असून तेथे एक हजारापेक्षा जास्त नागरिक वास्तव्यास आहेत. सोसायटीच्या शेजारी असलेल्या मुख्य पुलावर रात्रीच्या वेळी, तसेच भरदिवसा चिकनच्या गाड्या उभ्या करून त्यातील मृत कोंबड्या व इतर विष्ठा नाल्यामध्ये टाकली जाते. यामुळे परिसरात आजार पसरण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त आहे. शिवाय रस्त्यावर काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून पावसाळ्यात शेवाळ साचल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्येबाबत सोसायटीने नगरसेविका डॉ. पूजा गायकवाड यांच्याकडे लेखी तक्रार केली होती.
नागरिकांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ थांबवण्यासाठी महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने पाहणी करावी, दोषी विक्रेत्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी आणि भविष्यात असा प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे पत्र नगरसेविका डॉ. पूजा गायकवाड यांनी प्रशासनाला दिले आहे. तसेच परिसरात तातडीने ब्लीचिंग पावडरची फवारणी करून स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणीही केली आहे. सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी तक्रारीची दखल घेऊन चिकन विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.