मुंबई

महासभेत पाम बीच मार्गालगत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची आग्रही मागणी

CD

पाम बीच मार्गालगत सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारा
महासभेत नगरसेविका दीपाली सकपाळ यांची आग्रही मागणी
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई, ता. ३ : कोपरखैरणे, घणसोली, महापे आणि परिसरातील सुमारे तीन लाख नागरिकांच्या भविष्यातील आरोग्य सुरक्षेचा विचार करून पाम बीच रस्त्यालगतच्या ७,६०० चौरस मीटर राखीव भूखंडावर अत्याधुनिक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी नगरसेविका दीपाली सकपाळ यांनी नवी मुंबई महापालिकेच्या महासभेत केली. नगरसेविका सकपाळ यांनी मांडलेल्या ठरावांना महापौर सुजाता पाटील यांनी महापालिका कामकाज पूरक कार्यसूची समितीकडे पुढील आवश्यक प्रक्रियेसाठी वर्ग केले आहे.
सभागृहात ठराव मांडताना नगरसेविका दीपाली सकपाळ म्हणाल्या, की प्रभाग क्रमांक ९ मधील ७,६०० चौरस मीटरचा हा राखीव भूखंड सिडकोकडून पालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी त्या गेल्या १० वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. हा भूखंड पाम बीच रस्त्याला लागून मध्यवर्ती ठिकाणी असल्याने केवळ एका प्रभागापुरता मर्यादित नसून, कोपरखैरणे कॉलनी, घणसोली कॉलनी, कोपरखैरणे गाव, घणसोली गाव, महापे आणि अडवली-भुतवली परिसरातील जवळपास तीन लाख नागरिकांसाठी ते मध्यवर्ती रुग्णालय ठरेल. या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहती, गृहनिर्माण प्रकल्प आणि औद्योगिक क्षेत्र विस्तारले आहे. परिसरात माथाडी कामगार, रोजंदारीवरील कष्टकरी आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबे मोठ्या संख्येने राहतात. हृदयविकाराचा झटका, कर्करोग, रस्ते अपघात (ट्रॉमा), मेंदुविकार, गंभीर संसर्गजन्य आजार किंवा नवजात शिशु व महिलांच्या गुंतागुंतीच्या प्रसूतीदरम्यान रुग्णाला दूरच्या रुग्णालयात नेण्यात लागणारा वेळ जीवावर बेतू शकतो. त्यामुळे पालिकेचे हे प्रस्तावित रुग्णालय सर्वसामान्य व आर्थिक दुर्बल घटकांसाठी मोठा आधार ठरेल. या रुग्णालयात आपत्कालीन सेवा व ट्रॉमा सेंटर, हृदयरोग विभाग (कार्डिओलॉजी) व न्यूरोसर्जरी, कर्करोग निदान व उपचार केंद्र, डायलिसिस, आयसीयू, स्त्रीरोग, बालरोग व अत्याधुनिक निदान केंद्र अशा उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा विकसित करण्याची मागणी त्यांनी केली.
--------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Illegal Road Block: ९ कोटींच्या डांबरी रस्त्यावर बेकायदेशीर माती-दगडांचे ढिगारे; दुचाकीस्वार गंभीर जखमी, पीएमआरडीए निष्क्रिय

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा; कार्यकर्त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेतले, दीड तास रास्ता रोको

Marathi News Live Updates: जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळासोबत सरकारच्या प्रतिनिधींची चर्चा

रोहित शर्माचे भवितव्य ते अजित आगरकरांची गैरहजेरी... BCCI च्या Meeting मध्ये नेमकं काय घडलं?

अय्यो! टॉक्सिल'ला मागे टाकणाऱ्या 'हनुमान अंश'मध्ये झळकतेय मराठमोळी अभिनेत्री; सध्या स्टार प्रवाहवर करतेय काम, कोण आहे ती?

SCROLL FOR NEXT