मुंबई

मुंबईकरांनी घेतला मोकळा श्वास!

CD

मुंबईकरांनी घेतला मोकळा श्वास!
ऑगस्ट ठरला यावर्षीचा सर्वांत स्वच्छ महिना; ३१ पैकी २७ दिवस हवा ‘चांगली’

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला दरवर्षी ऑक्टोबरच्या अखेरपासून फेब्रुवारीपर्यंत वायुप्रदूषणाचा सामना करावा लागतो; मात्र यंदाचा ऑगस्ट महिना मुंबईकरांसाठी मोठा दिलासा देणारा ठरला आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या कालावधीतील वायू गुणवत्ता आकडेवारीच्या विश्लेषणातून ऑगस्ट हा यंदातील सर्वाधिक स्वच्छ महिना ठरल्याचे समोर आले आहे.
ऑगस्ट महिन्यातील ३१ पैकी तब्बल २७ दिवस मुंबईतील वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ५० पेक्षा कमी नोंदविण्यात आला. हा निर्देशांक ‘चांगली’ वायू गुणवत्ता दर्शवितो. उर्वरित चार दिवसांमध्येही एक्यूआय ५१ ते ५८ दरम्यान राहिला. ही वायू गुणवत्ता ‘समाधानकारक’ श्रेणीत येते.
यंदाच्या वर्षाची सुरुवात मात्र प्रदूषणाच्या सावटाखाली झाली होती. जानेवारी महिन्यात ३१ पैकी २३ दिवस एक्यूआय १०० पेक्षा अधिक नोंदविण्यात आला. फेब्रुवारीतही २८ पैकी २१ दिवस वायू गुणवत्ता ‘मध्यम’ म्हणजेच असमाधानकारक श्रेणीत होती. मार्च आणि एप्रिलमध्ये परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाली; मात्र या दोन्ही महिन्यांत काही दिवस एक्यूआय १०० ते १५० दरम्यान नोंदविण्यात आला. मे महिन्यापासून मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होण्यास सुरुवात झाली. मे मध्ये ३१ पैकी १२ दिवस एक्यूआय ५० पेक्षा कमी होता, तर उर्वरित दिवसांमध्येही तो १०० पेक्षा कमी राहिला. जूनमध्ये ३० पैकी १० दिवस, तर जुलैमध्ये ३१ पैकी १३ दिवस मुंबईची वायू गुणवत्ता ‘चांगली’ श्रेणीत होती; मात्र ऑगस्टने या सर्व महिन्यांना मागे टाकत यंदाच्या वर्षातील सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदविली.

यंदाच्या वर्षातील सर्वात कमी एक्यूआय
मॉन्सूनच्या काळात सातत्याने होणारा पाऊस, समुद्राकडून वाहणाऱ्या वाऱ्यांची सक्रियता आणि वातावरणातील प्रदूषक कण पावसामुळे धुवून निघणे, यामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारते, असे तज्ज्ञ राजेश कपाडिया यांनी सांगितले. याच कारणामुळे ऑगस्ट २०२६ हा मुंबईसाठी यंदातील आतापर्यंतचा सर्वाधिक स्वच्छ महिना ठरला आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या वर्षातील सर्वात कमी ३४ एक्यूआय २ जुलै आणि १२ ऑगस्ट रोजी नोंदविण्यात आला. त्यामुळे मॉन्सूनच्या काळात मुंबईच्या हवेची गुणवत्ता किती सुधारते, हेही या आकडेवारीतून स्पष्ट होते.

श्वसनाच्या समस्या
खराब हवेचा शरीरावर परिणाम केवळ श्वसनसंस्थेपुरता मर्यादित राहत नाही. हवेतील सूक्ष्म प्रदूषक कण, विशेषतः पीएम २.५ आणि पीएम १० शरीरात गेल्याने अनेक परिणाम होऊ शकतात. खोकला, घशात खवखव, कफ, घरघर आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. दम्याचा त्रास वाढू शकतो, तसेच फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होण्याचा धोका असतो. प्रदूषित हवा हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढवू शकते. डोळ्यांत जळजळ, पाणी येणे, लालसरपणा तसेच त्वचेची आग होऊ शकते. प्रदूषित हवेमुळे डोकेदुखी, अशक्तपणा किंवा अस्वस्थता जाणवू शकते. प्रदूषणाचा दीर्घकाळ संपर्क राहिल्यास फुप्फुसांचे आजार, हृदयविकार आणि इतर गंभीर आरोग्य समस्यांचा धोका वाढतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टिटवाळ्यातील कामामुळे आंबिवलीत प्रवासी रखडले, स्टेशन मास्टर कार्यालयात प्रवाशांनी घातला गोंधळ

Curtly Ambrose : त्याने विकेट घेतली की आई घराबाहेर घंटा वाजवायची! २१ व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केलेला तो जगातील महान गोलंदाज बनला

Janmashtami Bank Holiday: जन्माष्टमीनिमित्त 4 सप्टेंबरला बँका बंद की सुरू? UPI सेवेवर देखील परिणाम? पाहा RBI ची अपडेट

Life Horoscope: दीर्घायुष्य लाभलेल्या असतात ‘या’ राशीच्या व्यक्ती; आयुष्यात कितीही त्रास आला तरी लढण्याची ताकद कायम, तुमची रास कोणती?

Egg Freezing & Future Fertility: आई-वडिल होण्यासाठी अंडी फ्रीज करण्याचा विचार करताय? आधी ‘या’ ४ गोष्टी समजून घ्या

SCROLL FOR NEXT