मुंबई

भाजीपाल्याच्या दरात घसरण

CD

भाजीपाल्याच्या भावात घसरण
आवक वाढल्याने बहुतांश भाज्या २० ते ४० रुपये किलो

वाशी, ता. ३ (बातमीदार) ः श्रावण महिन्यात भाजीपाल्याची मागणी वाढलेली असतानाच वाशीतील घाऊक भाजीपाला बाजारात आवक वाढल्याने भावात मोठी घसरण झाली आहे. सध्या घाऊक बाजारात बहुतांश भाज्या २० ते ४० रुपये किलो भावाने उपलब्ध आहेत. घाऊक बाजारातील या घसरणीचा परिणाम किरकोळ बाजारावरही झाला असून, सध्या बहुतेक भाज्या ६० ते ८० रुपये किलो भावाने मिळत आहेत. यामुळे वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांना, विशेषतः गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांतून वाशी बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली आहे. पालेभाज्या, फळभाज्या आणि शेंगभाज्यांचा पुरवठा चांगला असल्याने मागणीच्या तुलनेत उपलब्धता अधिक आहे. परिणामी, श्रावणातील वाढत्या मागणीनंतरही भाव वाढण्याऐवजी कमी झाले आहेत.
सध्या घाऊक बाजारात लाल भोपळा आणि कोबी ६ ते १० रुपये किलो भावाने विकले जात आहेत. फ्लॉवर आणि दुधी भोपळा १२ ते १८ रुपये, पडवळ १६ ते २० रुपये, तर चवळी शेंग, ढेमसे, काकडी, ढोबळी मिरची, शिराळी आणि दोडकी २० ते ३० रुपये किलो भावात आहेत. फरसबी, घेवडा आणि गवार ३० ते ४० रुपये किलोवर आले आहेत. भेंडी २४ ते ३० रुपये, वांगी २० ते ३० रुपये, तर सुरण २४ ते २८ रुपये किलो भावाने उपलब्ध आहे.

टोमॅटो व मटारचे भावही नियंत्रणात
टोमॅटोचे भावही यंदा पावसाळ्यात नियंत्रणात आहेत. टोमॅटो १६ ते २० रुपये किलो भावात मिळत असून, गावठी आणि बंगळुरू टोमॅटोची आवक चांगली आहे. हिरवी मिरचीही ३० ते ४० रुपये किलोवर आली आहे. मागील महिन्यात १५० ते २०० रुपये किलो असलेला हिरवा मटार आता घाऊक बाजारात ६० ते ७० रुपये, तर किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये किलो भावात मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकीची मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका, नेत्याला मंत्रिपद गमावण्याची वेळ

Curtly Ambrose : त्याने विकेट घेतली की आई घराबाहेर घंटा वाजवायची! २१ व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केलेला तो जगातील महान गोलंदाज बनला

Koyana Dam : महाराष्ट्रासह कर्नाटकातील कृष्णाकाठला मोठा दिलासा! कोयना धरण शंभर टक्के भरले, १०५.२५ टीएमसी पाणीसाठा पूर्ण

Life Horoscope: दीर्घायुष्य लाभलेल्या असतात ‘या’ राशीच्या व्यक्ती; आयुष्यात कितीही त्रास आला तरी लढण्याची ताकद कायम, तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates: संतोष पंडित यांना ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT