नवी मुंबईच्या ‘नेकलेस’वर अंधार!
भरधाव वाहतुकीत अपघाताचा धोका
जुईनगर, ता. ४ (बातमीदार) : नवी मुंबईचा ‘नेकलेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाम बीच मार्गावर सानपाडा मोराज जंक्शन ते नेरूळ जंक्शनदरम्यान रात्रीच्या वेळी अनेक पथदिवे बंद असल्याने या महत्त्वाच्या मार्गावर अंधार पसरली आहे. भरधाव वाहतूक आणि अत्यंत वर्दळ असलेल्या या रस्त्यावर दिव्यांअभावी अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला असून, स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांनी महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नवी मुंबईच्या वैभवात पाम बीच हा भर घालणारा प्रमुख मार्ग मानला जातो. या मार्गावर दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच इतर भागांतून ये-जा करणारे हजारो वाहनचालक या मार्गाचा वापर करतात. मात्र काही अंतरावर असलेले पथदिवे रात्रीच्या वेळी बंद असल्याने वाहनचालकांना अंधारातून प्रवास करावा लागत आहे. अशा परिस्थितीत रस्त्यावरील प्रकाशव्यवस्था सुरळीत असणे आवश्यक आहे. पथदिवे बंद असल्यामुळे रस्त्यावरील अडथळे, वळणे, रस्त्याकडेला असलेली वाहने किंवा इतर वाहनांची स्थिती वेळेत लक्षात न आल्यास अपघाताचा धोका वाढू शकतो. विशेषतः रात्रीच्या वेळी दुचाकीस्वार तसेच या मार्गाची पूर्ण माहिती नसलेल्या वाहनचालकांना अंधारामुळे अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
महापालिका प्रशासनाने सानपाडा मोराज जंक्शन ते नेरूळ जंक्शनदरम्यान रात्रीच्या वेळी प्रत्यक्ष पाहणी करावी. बंद असलेले सर्व पथदिवे तातडीने सुरू करावेत तसेच पथदिव्यांच्या देखभालीमध्ये त्रुटी असल्यास त्याची कारणे शोधून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.