सानपाड्यात पार्किंगच्या जागेतील अनधिकृत बांधकामावर कारवाई
चार दुकानांतील व्यावसायिक वापराचे बांधकाम निष्कासित; महापालिकेची धडक मोहीम
तुर्भे, ता. ३ (बातमीदार) ः तळमजल्यावरील स्कूटर पार्किंगच्या जागेवर अनधिकृतपणे बांधकाम करून सुरू असलेला व्यावसायिक वापर नवी मुंबई महापालिकेने कारवाई करून बंद केला. तुर्भे विभागांतर्गत सेक्टर १, सानपाडा येथील चार दुकानांवर ही तोडक कारवाई करण्यात आली.
सेक्टर १ मधील भूखंड क्रमांक २३, २४, ४६ ते ५० येथील मे. शिवशंकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या दुकान क्रमांक ६, ७, ८ आणि ९ येथे महापालिकेच्या पथकाने पाहणी केली. या वेळी तळमजल्यावरील स्कूटर पार्किंगच्या जागेत विनापरवानगी बांधकाम करून त्याचा व्यावसायिक वापर सुरू असल्याचे आढळून आले.
दुकान क्रमांक ६ आणि ९ येथे प्रत्येकी ३.६५ मीटर x २ मीटर, तर दुकान क्रमांक ७ आणि ८ येथे प्रत्येकी ३.५० मीटर x २ मीटर क्षेत्रफळात अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते.
या बांधकामासंदर्भात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५३(१) अन्वये संबंधितांना नोटीस बजावण्यात आली होती; मात्र त्यानंतरही अनधिकृत बांधकामाचा व्यावसायिक वापर सुरूच असल्याने महापालिकेने अखेर तोडक कारवाई केली. या कारवाईत चारही ठिकाणचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले.
महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त राहुल गेठे आणि उपआयुक्त (अतिक्रमण) संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त सागर मोरे यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी कारवाईच्या वेळी उपस्थित होते.
कारवाईसाठी अतिक्रमण निर्मूलन पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार तसेच महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली होती. अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी एक जेसीबी, दोन इलेक्ट्रिकल हॅमर, एक गॅस कटर आणि २४ मजुरांची मदत घेण्यात आली.
अनधिकृत बांधकामांवर नवी मुंबई महापालिका कारवाई तीव्र करणार क्षेत्रात विनापरवानगी बांधकाम करून त्याचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांविरोधात यापुढेही कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.