ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील
दक्षता पथक प्रमुखाची आत्महत्या
शहापूर, ता. ३ (वार्ताहर) : दशक्रिया विधीला जात असल्याचे सांगूत घरातून बेपत्ता झालेल्या महसूल मंडळ अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शहापूरमधील बामणे गावात घडली. अरुण वामन शेलार (वय ५६) असे मृत महसूल मंडळ अधिकाऱ्याचे नाव असून, ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील रेती गट शाखेत दक्षता पथकाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.
अरुण शेलार २८ ऑगस्टला सकाळी पावणेनऊच्या सुमारास दशक्रिया विधीला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा विविध ठिकाणी शोध घेतल्यानंतर शहापूर पोलिस ठाण्यात बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, गुरुवारी (ता. ३) सकाळी साडेसहाच्या सुमारास अरुण यांचा भाऊ कल्याण येथे जाण्यासाठी निघाला असताना त्यांच्या घराजवळील दुकानांच्या समोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला रुमालाने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. स्थानिकांच्या मदतीने त्यांना खाली उतरवून रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शेलार यांनी आत्महत्येपूर्वी पत्नीच्या नावाने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली असून, त्यामध्ये त्यांच्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये, असा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नसून, याप्रकरणी अधिक तपास शहापूर पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.