मुंबई

भिवंडी पालिका सभागृहातील महासभेत गंभीर विषयांवर चर्चा सुरू असताना बुरखाधारी महिला नगरसेविका मोबाईलवर ‘कॅंडी क्रश’ खेळताना कॅमेऱ्यात कैद

CD

महासभेत ‘कॅंडी क्रश’
चर्चेदरम्यान नगरसेविका गेम खेळताना कॅमेऱ्यात कैद

भिवंडी, ता. ३ (वार्ताहर) : भिवंडी महापालिकेच्या महासभेत शहरातील गंभीर प्रश्नांवर चर्चा सुरू असताना एक बुरखाधारी महिला नगरसेविका मोबाईलवर ‘कॅंडी क्रश’ गेम खेळताना कॅमेऱ्यात कैद झाल्या. हा प्रकार गुरुवारी (ता. ३) समोर आला.
महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी दुपारी महासभा सुरू होती. शहराचे उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासह कोहिनूर इमारत दुर्घटनेबाबत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून चर्चा सुरू होती. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाल्याने पीडितांना मदत मिळवून देण्यासह शहरातील विविध मूलभूत प्रश्नांवर सभागृहात चर्चा अपेक्षित होती. मात्र याच वेळी एक बुरखाधारी महिला नगरसेविका मोबाईलवर ‘कॅंडी क्रश’ गेम खेळत असल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले.
संबंधित नगरसेविकेने बुरखा परिधान केला असल्याने त्या नेमक्या कोण आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र महासभेसारख्या महत्त्वाच्या बैठकीत गंभीर विषयावर चर्चा सुरू असताना मोबाईलवर गेम खेळण्याचा प्रकार समोर आल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कोणार्क विकास आघाडीचे गटनेते तथा माजी महापौर विलास पाटील यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. कोहिनूर इमारत दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत पीडितांना कशी मदत देता येईल, यावर चर्चा होणे अपेक्षित आहे. मात्र महासभेत नगरसेविकेकडून मोबाईलवर गेम खेळला जाणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. भविष्यात कोणत्याही नगरसेवकाने महासभेत अशा प्रकारचे वर्तन करू नये, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकीची मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका, नेत्याला मंत्रिपद गमावण्याची वेळ

Curtly Ambrose : त्याने विकेट घेतली की आई घराबाहेर घंटा वाजवायची! २१ व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केलेला तो जगातील महान गोलंदाज बनला

Koyana Dam : महाराष्ट्रासह कर्नाटकातील कृष्णाकाठला मोठा दिलासा! कोयना धरण शंभर टक्के भरले, १०५.२५ टीएमसी पाणीसाठा पूर्ण

Life Horoscope: दीर्घायुष्य लाभलेल्या असतात ‘या’ राशीच्या व्यक्ती; आयुष्यात कितीही त्रास आला तरी लढण्याची ताकद कायम, तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates: संतोष पंडित यांना ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT