सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : गहाळ झालेला मोबाईल परत मिळण्याची आशा सोडलेल्या ठाणेकरांना गुन्हे शाखेने दिलासा दिला आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयातील विविध पोलिस ठाण्यांत नोंद असलेल्या गहाळ मोबाईलचा सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून शोध घेत गुन्हे शाखेने १८० मोबाईल हस्तगत केले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत १९ लाख ५९ हजार २०० रुपये आहे.
गहाळ मोबाईलच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत पोलिस आयुक्त आशुतोष डुबरे यांनी नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी गहाळ मोबाईल शोधण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेने स्वतंत्र पथके तयार करून सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून मोबाईलचा तांत्रिक पद्धतीने शोध सुरू केला. गहाळ झालेले अनेक मोबाईल मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तींनी ते ठाणे शहराबाहेर विकल्याचे तपासात आढळून आले. काही मोबाईल महाराष्ट्राबाहेरील राज्यांतही वापरले जात असल्याचे ‘सीईआयआर’च्या माध्यमातून स्पष्ट झाले. त्यामुळे हे मोबाईल पुन्हा मिळविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी संबंधित मोबाईलधारकांशी संपर्क साधून त्यांना कायदेशीर बाबींची माहिती दिली आणि मोबाईल परत मिळवले.
या कारवाईमुळे गहाळ मोबाईलच्या तक्रारींचे निराकरण होण्यास मदत झाली असून, नागरिकांना त्यांचे फाेन परत मिळाले आहेत. पोलिसांच्या तांत्रिक तपासासोबतच अधिकारी व अंमलदारांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ही कामगिरी शक्य झाली.
ही कारवाई पोलिस आयुक्त आशुतोष डुबरे, सह पोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, सह पोलिस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
घटकनिहाय कामगिरी
गुन्हे शाखेचा घटक मोबाईल किंमत
घटक-२ (भिवंडी) ८० ८,८२,२००
घटक-३ (कल्याण) ६० ४,५०,०००
घटक-४ (उल्हासनगर) १५ २,५२,०००
घटक-५ (वागळे इस्टेट) २५ ३,७५,०००
एकूण १८० १९,५९,२००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.