मुंबई

नवी मुंबईतील रेल्वे स्थानके व शाळा-कॉलेज आवारातील ड्रग्जचा विळखा मोडून काढणार

CD

नवी मुंबईतील रेल्वे स्थानके व शाळा-कॉलेज आवारातील ड्रग्जचा विळखा मोडून काढणार
महापौरांच्या पुढाकाराने कडक कारवाईचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३ : नवी मुंबईतील रेल्वे स्थानक परिसर आणि विविध शाळा-महाविद्यालयांच्या आवारात वाढणाऱ्या अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) विक्रीविरोधात आणि गर्दुल्ल्यांच्या वावराविरोधात नवी मुंबई पालिकेने आक्रमक भूमिका घेतली आहे. महापौर सुजाता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष बैठकीत पोलिस प्रशासन, पालिका, सिडको आणि रेल्वे प्रशासनाने संयुक्तपणे धाडसी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
क्रीडा समिती सभापती गिरीश म्हात्रे यांनी दिलेल्या पत्रानंतर ही तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला पालिका आयुक्त, विविध प्रभागांचे अध्यक्ष, वॉर्ड अधिकारी आणि पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ निरीक्षक उपस्थित होते. शाळा आणि महाविद्यालयांच्या बाहेर ड्रग्जची विक्री बैठकीदरम्यान महापौरांनी अत्यंत गंभीर घटनेचा आणि तक्रारींचा संदर्भ दिला. नवी मुंबईतील अनेक शाळा आणि कॉलेजच्या प्राचार्यांनी प्रशासनाकडे थेट पत्र देऊन त्यांच्या शैक्षणिक परिसराबाहेर उघडपणे अमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. लहान मुले व तरुण पिढी या जाळ्यात अडकत असून, शाळा-कॉलेजांच्या बाहेर होणारी ही अवैध विक्री विद्यार्थ्यांच्या सुरक्षा आणि भविष्यासाठी अत्यंत घातक ठरत आहे. तरुणांना ड्रग्ज आणि स्क्रीन ॲडिक्शनपासून दूर ठेवून मैदानी खेळांकडे वळवण्यासाठी शहरात क्रीडा संस्कृती वाढवण्यावर भर दिला जाईल, तसेच शहराच्या आरोग्य धोरणातही या सुधारणांचा समावेश केला जाईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

रेल्वे स्थानकांना गर्दुल्ल्यांचा विळखा

एकेकाळी वाशी आणि नेरूळ यांसारखी सुंदर व भव्य रेल्वे स्थानके नवी मुंबईची ओळख मानली जात होती. मात्र सध्या स्थानकांच्या मोकळ्या जागांवर आणि बाहेर गर्दुल्ले, मद्यपी व समाजकंटकांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यामुळे रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या महिला व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नेरूळ स्टेशन परिसरातील वाढती गर्दी आणि त्या ठिकाणी असलेल्या मद्यालयांच्या परवानग्यांवरही महापौरांनी कायदेशीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

बैठकीत ठरलेल्या प्रमुख उपाययोजना
संयुक्त कृती दल : सिडको, रेल्वे प्रशासन, महापालिका आणि पोलिस प्रशासन या चारही संस्थांनी एकत्र येऊन सातत्याने कारवाई करण्यासाठी विशेष पथक स्थापन केले जाईल.
गणेशोत्सवापूर्वी विशेष मोहीम : येणाऱ्या गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व रेल्वे स्थानक परिसर आणि शाळा-कॉलेज आवारातील गर्दुल्ल्यांवर पोलिस प्रशासनाकडून थेट कारवाई केली जाईल.
कायमस्वरूपी पोलिस चौकी : तात्पुरत्या कारवाईनंतर हे गर्दुल्ले पुन्हा त्या ठिकाणी येऊ नयेत, यासाठी रेल्वे स्थानक आणि संवेदनशील परिसरात कायमस्वरूपी पोलिस चौकी उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पडीक वास्तूंवर कडक निगराणी : महापालिकेच्या ज्या इमारती किंवा वास्तू वापरविना पडून आहेत, तेथे गर्दुल्ले आश्रय घेत असल्याने अशा जागांवर पालिकेकडून कडक निगराणी ठेवली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकीची मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका, नेत्याला मंत्रिपद गमावण्याची वेळ

Curtly Ambrose : त्याने विकेट घेतली की आई घराबाहेर घंटा वाजवायची! २१ व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केलेला तो जगातील महान गोलंदाज बनला

Koyana Dam : महाराष्ट्रासह कर्नाटकातील कृष्णाकाठला मोठा दिलासा! कोयना धरण शंभर टक्के भरले, १०५.२५ टीएमसी पाणीसाठा पूर्ण

Life Horoscope: दीर्घायुष्य लाभलेल्या असतात ‘या’ राशीच्या व्यक्ती; आयुष्यात कितीही त्रास आला तरी लढण्याची ताकद कायम, तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates: संतोष पंडित यांना ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT