मुंबई

विधि विभागाच्या सचिवांचे वर्तन पूर्णतः अक्षम्य

CD

विधी सचिवांना अवमान नोटीस 
अक्षम्य वर्तनावरून न्यायालयाचे ताशेरे

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : जलदगती न्यायालयातील रिक्त पदांच्या  प्रकरणावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या प्रश्नांची उत्तरे  उद्धट, आक्रमक आणि मोठ्या आवाजात दिल्याबद्दल उच्च न्यायालयाने विधी व न्याय विभागाचे सचिव तसेच सल्लागार दिलीप घुमारे यांना धारेवर धरले. त्याचे वर्तन पूर्णतः अक्षम्य असल्याचे ताशेरेही ओढत न्यायालयाने अवमान नोटीस बजावली.
जलदगती न्यायालयांमधील १७९ रिक्त पदे भरण्याबाबतच्या प्रतिज्ञापत्रातील मुद्यांवर न्या. अजय गडकरी आणि न्या.कमल खाता यांच्या खंडपीठाने घुमारे यांच्याकडे विचारणा केली. सुरुवातीला घुमारे यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केल्यावर हे प्रतिज्ञापत्र कोणी तयार केले, अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यावर उत्तर देण्याऐवजी घुमारे यांनी आक्रमक होऊन मोठ्या आवाजात बोलण्यास सुरुवात केली. रिक्त पदे न भरण्यास उच्च न्यायालयाचे प्रशासनच जबाबदार असल्याचा दावा केला. त्यावर घुमारे यांचे वर्तन ‘पूर्णतः अक्षम्य’ असून ते सहन केले जाऊ शकत नाही, असेही खंडपीठाने सर्वांसमक्ष स्पष्ट केले. ‘पद मोठे असले तरी न्यायालयाचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. घुमारे हे पूर्वी प्रधान सचिव आणि सध्या विधी न्याय विभागाचे सचिव व वरिष्ठ सल्लागार आहेत; परंतु त्यांचा प्रशासकीय पदाचा दर्जा त्यांना न्यायालयाचा अनादर करण्याचा अधिकार देत नाही, असे न्यायालयाने सुनावले आणि कारणे दाखवा नोटीस बजावून  पुढील सुनावणी ११ सप्टेंबरला सूचिबद्ध केली.

माफी मागितल्याने सुटका नाही
घुमारे यांच्या वर्तनामुळे व्यथित होऊन न्यायालयाने महाधिवक्त्यांना पाचारण केले. महाधिवक्ता मिलिंद साठ्ये यांनी घुमारे यांच्या वतीने माफी मागितली; मात्र खंडपीठाने ती स्वीकारण्यास नकार दिला. न्यायिक अधिकारी भर न्यायालयात असे वर्तन करून माफी मागून त्यातून सुटकेची अपेक्षा ठेवू शकत नाही. त्यांच्या कृत्यावर वरिष्ठ वकील किंवा महाधिवक्त्यांनामार्फत औपचारिक माफी मागून मुक्तता होते, असा चुकीचा संदेश जाईल, हेही न्यायालयाने अधोरेखित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Umarga News : उमरगा तालुक्यावर शोककळा! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी मोहिते यांनी चिमुकल्यासह संपविले जीवन; एक मुलगा, एक मुलगी दगावली

'हमाल दे धमाल'च्या 'ढाकुमाकुम' गाण्यात निळू फुलेंसोबत दिसणाऱ्या 'या अभिनेत्याला ओळखलंत? आता गाजवतोय छोटा पडदा

Marathi News Live Updates: राधाकृष्ण विखे पाटील अंतरवाली सराटीमध्ये दाखल

Rohit Sharma : एकिकडे रोहितच्या भविष्याची चर्चा अन दुसरीकडे त्याच्या नव्या इनिंगची घोषणा! Video होतोय Viral

Chakur Robbery Case: चाकूरमध्ये चाकूचा धाक दाखवून महिलेची सोन्याची लूट; आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारासह दोघे गजाआड

SCROLL FOR NEXT