मुंबई

मनसेच्या आजी-माजी कार्यकर्ते आमने-सामने

CD

मनसेचे आजी-माजी कार्यकर्ते आमनेसामने
दहीहंडीसाठी स्थळाचा वाद

मुंबई, ता. ३ : भांडुप येथील अशोक केदारे चौकात दहीहंडी उत्सव साजरा करण्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आजी-माजी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी कोण बांधणार, या प्रश्नी महापालिका आयुक्तांना निर्णय घेण्याचे आदेश गुरुवारी (ता. ३) उच्च न्यायालयाने दिले.
दहीहंडी उत्सवासाठी अनेक परवानग्या देण्यावर कोणतीही बंदी नाही; परंतु एका विशिष्ट ठिकाणी दोन हंड्या असू शकत नाहीत, असे निरीक्षण प्रभारी मुख्य न्या. रवींद्र घुगे आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने नोंदवले. त्याच वेळी दोन्ही अर्ज भांडुप पोलिसांकडे पाठवल्याबद्दल न्यायालयाने पालिकेवर टीकाही केली. न्यायालयाने पालिका आयुक्तांना शुक्रवारी (ता. ४) सकाळी ११ वाजता त्यांच्या कार्यालयात दोन्ही पक्षकरांसोबत बैठक घेण्याचे आदेश दिले. त्यांची बाजू ऐकल्यानंतर योग्य निर्णय घ्यावा, त्यांचा निर्णय अंतिम असेल, असेही स्पष्ट करून न्यायालयाने याचिका निकाली काढली. याचिकाकर्ते संदीप जळगावकर यांनी ॲड. पुरेश सबरड यांच्यामार्फत याचिका केली होती.
...
प्रकरण काय?
याचिकाकर्ते संदीप जळगावकर यांनी निवडणुकीनंतर मनसे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात प्रवेश केला. भांडुपस्थित स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडी उत्सव २०२२ पासून मनसेकडून करण्यात येत असे. जळगावकर हे विभागाध्यक्ष असल्याने त्यांच्या नावाने पोलिस आणि वाहतूक विभागाकडून परवानग्या मिळत होत्या. गेल्या वर्षी जळगावकर आणि मनसे या दोन्ही पक्षांना एकच ठिकाणी उत्सवासाठी परवानगी मिळाल्याचे महापालिकेला निदर्शनास आल्यानंतर पेच निर्माण झाला. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पालिका आणि पोलिस प्रशासनाने दोन्ही गटाला दिलेल्या परवानग्या रोखल्या. त्या निर्णयाला जळगावकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने मात्र पालिकेचा निर्णय कायम ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: उद्यापासून हैदराबाद गॅझेटप्रमाणे अर्ज करा- जरांगे

माजी भारतीय कर्णधार तारक राऊळ काळाच्या पडद्याआड; कबड्डी जगतावर शोककळा

CJPवर गंभीर आरोप करत बनवली नवी पार्टी, CJP-Dची घोषणा; दीपकेच्या घराबाहेर केलेलं आंदोलन

दुचाकीधारकांना दररोज कमाईची संधी, केंद्रीय मंत्री गडकरींनी दिली मोठी माहिती; ड्रायव्हिंग लायसनबाबतही नवा नियम

तब्बल ९२ किलोची होती जान्हवी किल्लेकर; प्रेग्नन्सीनंतर घटवले ४३ किलो पण कसे? म्हणाली, 'मी धावायला जायचे पण...

SCROLL FOR NEXT