CJPवर गंभीर आरोप करत बनवली नवी पार्टी, CJP-Dची घोषणा; दीपकेच्या घराबाहेर केलेलं आंदोलन

CJP-D Party Announced कॉकरोच जनता पार्टीच्या कोअर टीमच्या बैठकीला न बोलावल्यानं अभिजीत दीपकेच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या मनिष ब्रह्मभट्टने नव्या पार्टीची घोषणा केलीय. तसंच अभिजीत दीपकेसह सीजेपीवर गंभीर आरोप केलेत.
CJP-D Party Announced

CJP-D Party Announced

Esakal

Updated on

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या कॉकरोच टिप्पणीनंतर अभिजीत दीपके यानं कॉकरोच जनता पार्टी सुरू केली. यानंतर नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करत धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडलं. यानंतर देशातील सरकारी शाळांच्या सुधारणेसाठी मोहिम हाती घेण्यात आलीय. दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीमध्ये फूट पडली आहे. कॉकरोच जनता पार्टीचं समर्थन करणाऱ्या मनीष ब्रह्मभट्टने आता वेगळ्या संघटनेची घोषणा केलीय. त्याचं नावही जाहीर करण्यात आलं आहे. कॉकरोच जनता पार्टी डेमोक्रेटिक असं नाव जाहीर करत ब्रह्मभट्टने अभिजीत दीपकेवर गंभीर आरोप केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com