मुंबई

रील्सचे शूटिंग करणाऱ्या व्हिडिओग्राफरला मारहाण

CD

​उल्हासनगर, ता. ४ (वार्ताहर) : उल्हासनगरमधील सेक्शन २६ मधील राजाच्या आगमनावेळी रील्सचे शूटिंग करणाऱ्या व्हिडिओग्राफर आणि त्याच्या सहकाऱ्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना बुधवारी (ता. २) रात्री रिजन्सी क्लासिक इमारतीसमोर घडली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, आशेळेपाडा येथील रहिवासी आणि एडिटिंगचे काम करणारे हितेश मोरे (वय २२) हे त्यांच्या सहकाऱ्यांसह सेक्शन २६ च्या राजाच्या आगमनाचे फोटो आणि रील्सचे शूटिंग करत होते. शूटिंगदरम्यान यश थदाणी हा वारंवार कॅमेऱ्यामध्ये येत होता. त्यामुळे तक्रारदारांचे सहकारी आदर्श बनसोडे यांनी यशला बाजूला होण्यास सांगितले. ​याचा राग आल्याने थदाणी याने मित सिंग, चेतन आणि अन्य एका मित्राला घटनास्थळी बोलावून घेतले. या चौघांनी मिळून आदर्शला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. भांडण सोडवण्यासाठी हितेश मोरे मध्ये पडले असता, सिंग याने हातातील कड्याने दितेश यांच्या डाव्या डोळ्यावर मारून त्यांना दुखापत केली. ​घटनेनंतर मोरे यांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बी. बी. क्षीरसागर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav : पुणे जिल्ह्यात सहा दिवस रात्री बारापर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकास परवानगी

CM Devendra Fadnavis : बजाज फिनसर्व्हच्या मुख्यालयामुळे पुण्‍यात ४० हजार रोजगारांची संधी

Marathi News Live Updates : ''मला कॅन्सर झाला, ईडीच्या तुरुंगात असताना आजाराची सुरुवात'', संजय राऊतांचा मोठा खुलासा

CM Devendra Fadnavis : लोकसहभागानेच ‘डीजे’ चे स्तोम कमी होईल; पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा

Pune News : राज्यसेवा मुलाखतीसाटी ‘बार्टी’कडून आर्थिक सहाय्य

SCROLL FOR NEXT