कांदे ६० रुपये किलो
एपीएमसीत भाव वाढले; ग्राहकांचे बजेट कोलमडले
जुईनगर, ता. ६ (बातमीदार) : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या कांद्याच्या भावाने अखेर पन्नाशी पार केली आहे. एपीएमसी घाऊक बाजारात शुक्रवारी (ता. ४) कांद्याला प्रतिकिलो ५२ ते ५३ रुपयांचा भाव मिळाला. या भाववाढीमुळे बळीराजाला दिलासा मिळाला असला, तरी किरकोळ बाजारात कांदा ६५ ते ७० रुपये प्रतिकिलोवर पोहोचल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
एपीएमसीच्या बाजारात शुक्रवारी कांद्याची सुमारे १५० गाड्यांची आवक झाली. मागील महिन्यात ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो असलेला कांदा अवघ्या काही दिवसांत पन्नाशीच्या पुढे गेला आहे. विशेष म्हणजे दिल्ली आणि बंगळूर बाजारात कांद्याचे भाव यापूर्वीच ५० रुपयांच्या आसपास पोहोचले होते. यंदा पावसामुळे अनेक भागांमध्ये कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच बाजारात उपलब्ध कांद्याच्या भावात वाढ होत आहे. दरम्यान, पावसाने काहीशी उसंत घेतल्याने बाजारपेठेतील कांदा व्यवहाराला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. नवीन कांद्याची आवक बाजारात मोठ्या प्रमाणात सुरू होईपर्यंत सध्याची भाववाढ कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. मागणीच्या तुलनेत बाजारातील आवक कमी राहिल्यास भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय बाजार एपीएमसी घाऊक भाव (प्रतिकिलो) किरकोळ भाव (प्रतिकिलो)
कांदा ४६ ते ५३ ६५ ते ७०
बटाटा १० ते १४ २५ ते ३०
लसूण १५० ते २२० २५० ते ३००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.