एनसीएमसी कार्ड वितरण केंद्रे वाढवण्याची मागणी
ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय; महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर रांगेत ताटकळण्याची वेळ
पोयनाड, ता. ४ (बातमीदार) : एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी सुरू केलेल्या एनसीएमसी कार्डच्या वितरण केंद्रांची संख्या अपुरी असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पोयनाड परिसरातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना कार्ड काढण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असून, कार्ड नसल्यास सवलतीच्या योजनांचा लाभ मिळत नसल्याने आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
एसटी महामंडळाने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सवलतींच्या योजना जाहीर केल्या असून, त्यासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र पोयनाड बस स्थानकात कार्ड काढण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याने सावळागोंधळ निर्माण होत आहे. त्यातच काही प्रवाशांकडे कार्ड असूनही तांत्रिक अडचणींमुळे ते सुरू होत नसल्याच्या तक्रारी आहेत.
पोयनाड, शहाबाज, शहापूर, कुर्डुस, ताडवागळे आणि कोळघर परिसरातून एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या भागातील कार्डधारकांची वाढती संख्या लक्षात घेता महामंडळाने वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज आहे. पोयनाडसह कुसुंबळे आणि कुर्डूस येथेही एनसीएमसी कार्ड वितरण केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
प्रवाशांच्या संख्येनुसार सुविधा
पोयनाड परिसरातून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी एसटीने प्रवास करतात. त्यामुळे एकाच केंद्रावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी परिसरातील प्रमुख ठिकाणी अतिरिक्त वितरण केंद्रे सुरू करणे आवश्यक आहे. यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय कमी होऊन त्यांना सवलतीच्या योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.