‘उत्सव गणरायाचा, जागर पर्यावरणाचा’
लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती निर्मितीची कार्यशाळा
पनवेल, ता. ७ (बातमीदार) : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी पनवेल पालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान ७.० अंतर्गत ‘उत्सव गणरायाचा, जागर पर्यावरणाचा’ या विशेष उपक्रमाचे आयोजन केले आहे. महापौर नितीन पाटील व आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवल्या जाणाऱ्या या अभियानाचा भाग म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल येथे शाडू मातीच्या गणेशमूर्ती निर्मितीची कार्यशाळा पार पडली.
विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने पालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे विविध ठिकाणी अशा कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त स्वरूप खारगे यांनी दिली. कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना शाडू मातीच्या गणेशमूर्तींचे पर्यावरणीय फायदे, महत्त्व आणि उत्सव काळात पर्यावरण संवर्धनाची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वतःच्या हाताने शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार केल्या.
‘माझी वसुंधरा’ प्रतिज्ञा
मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व उपस्थितांनी ‘माझी वसुंधरा’ प्रतिज्ञा घेत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. गणेशोत्सव हा श्रद्धेचा उत्सव असतानाच तो पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. नागरिकांनी शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करून पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पनवेल पालिकेच्या वतीने करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.