मुंबई

गणेश-नवरात्र मंडळांना ‘भाडेमाफी’ भेट?

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांच्या मंडप उभारणीवरील आर्थिक भार यंदा हलका होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवासाठी तात्पुरते मंडप उभारणाऱ्या मंडळांकडून आकारण्यात येणारे मंडप भाडे, तसेच अनामत रक्कम माफ करण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिका प्रशासनाने महासभेच्या निर्णयासाठी पुढे केला आहे. महापालिका आयुक्तांनीही प्रस्ताव महासभेसमोर ठेवण्याचे निर्देश दिल्याने मंडळांच्या नजरा आता महासभेच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.

नगरसेविका शीतल संतोष ढमाले यांनी ९ ऑगस्टला महापालिका आयुक्तांकडे पत्र देऊन गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांकडून आकारण्यात येणारे मंडप भाडे आणि अनामत रक्कम माफ करण्याची मागणी केली होती. या मागणीवर अतिक्रमणविरोधी विभागाने प्रस्ताव तयार करून तो आयुक्तांकडे सादर केला. त्यानंतर आयुक्तांनी हा विषय महासभेच्या निर्णयासाठी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मंडप भाडेमाफीचा निर्णय वेळेत न झाल्याने मागील वर्षी काही मंडळांना आर्थिक फटका बसला होता.

परवानगी प्रक्रियेदरम्यान काही मंडळांकडून भाडे आणि अनामत रक्कम वसूल करण्यात आली. त्यानंतर भाडेमाफीचा निर्णय झाल्यावर ही रक्कम संबंधित मंडळांना परत करण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाला करावी लागली. या अनुभवातून धडा घेत यंदा मंडप उभारणीच्या परवानगीची प्रक्रिया सुरू होण्याच्या किमान १५ ते २० दिवस आधीच भाडे आणि अनामत रक्कम माफीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे मंडळांना परवानगी घेताना नेमकी आर्थिक तरतूद किती करायची, याबाबत संभ्रम राहणार नाही; मात्र २०२६च्या उत्सवासाठी सरकारकडून अद्याप निर्णय झालेला नसल्याने आता महापालिकेच्या महासभेचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

परवानगी द्या; पण शुल्काचा घोळ नको!
दरवर्षी उत्सव जवळ आला की मंडप परवानगी, शुल्क आणि अनामत रकमेचा विषय ऐरणीवर येतो. निर्णयाला विलंब झाल्यास मंडळांकडून आधी रक्कम वसूल करून नंतर ती परत करण्याची वेळ प्रशासनावर येते. त्यामुळे यंदा उत्सव सुरू होण्यापूर्वीच धोरण स्पष्ट करण्याची मागणी होत आहे. आता अतिक्रमणविरोधी विभागाचा प्रस्ताव आयुक्तांच्या निर्देशानंतर महासभेसमोर येणार आहे. महासभा मंडळांच्या बाजूने निर्णय घेते, की २०११च्या शुल्क आकारणीचा नियम कायम ठेवते, याकडे ठाण्यातील मंडळांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejas Express: तेजसच्या प्रवासात मोदकांचा गोडवा! गणेशोत्सवात भाविकांसाठी आयआरसीटीसीची खास मेजवानी

India vs Japan: टीम इंडिया 'सुझुकी कप'साठी जपानच्या दौऱ्यावर; कधी खेळला जाणार ऐतिहासिक सामना? BCCI कडून घोषणा

पार्किंगमध्ये स्ट्रेचरवर आईचा मृतदेह अन् बाजूला बसलेला हताश बाप; झाशीच्या वैद्यकीय महाविद्यालयात हृदयद्रावक घटना

Marathi News Live Updates : अमरावतीत अल्पवयीन तरुणीची हत्या प्रकरण, आरोपीला ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Maratha Reservation : सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आष्टामोड येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन

SCROLL FOR NEXT