पेण तालुक्यातील सर्व शाळा नीटनेटक्या करा
सभापती वैकुंठ पाटीला यांच्या सूचना
गणेशोत्सवापूर्वी पंचायत समितीच्या विविध विभागांचा आढावा; स्वच्छता अभियान राबविण्याचे आदेश
पेण, ता. ४ (वार्ताहर) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय शाळांसाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला असल्याने पेण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा नीटनेटक्या ठेवण्याच्या सूचना रायगड जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळवताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून गणेशोत्सवापूर्वी पेण तालुक्यातील विविध विभागांची आढावा बैठक गुरुवारी (ता. ३) झाली. या वेळी पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, उपसभापती संजय डंगर, गटविकास अधिकारी गजानन लेंडी, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, जनार्दन भस्मा, सुशांत खाकर, विवेक म्हात्रे, प्रदीप म्हात्रे, जोमा दरवडा यांच्यासह ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामसेवक, आरोग्य विभागातील कर्मचारी, आशा वर्कर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
तालुक्यातील शाळा, अंगणवाड्या, ग्रामपंचायत कार्यालये आणि इतर विकासकामे विविध योजनांच्या माध्यमातून पूर्ण करून घ्यावीत. तसेच गणेशोत्सवापूर्वी सर्व ग्रामपंचायतींनी स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवावे, असे निर्देश पाटील यांनी दिले. दरम्यान, शाळांमध्ये स्वयंपाक करणाऱ्या महिलांना कमी मानधन मिळत असल्याने त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होत आहे. त्यामुळे त्यांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी जोमा दरवडा यांनी बैठकीत केली. ग्रामपंचायतीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
शालेय सुविधांसोबत स्वच्छतेवरही भर
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि पोषक शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी शाळांच्या इमारती, परिसर आणि मूलभूत सुविधांची देखभाल करण्यावर भर देण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचनांमुळे शाळा, अंगणवाडी आणि सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.