मुंबई

ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याची अंतर्गत स्वच्छता सुरू

CD

ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याची अंतर्गत स्वच्छता सुरू
बारा कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत; सप्टेंबरअखेरीस पर्यटकांसाठी किल्ला खुला होण्याची शक्यता

मुरूड, ता. ४ (बातमीदार) : समुद्रातील ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याची अंतर्गत स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली असून, पुरातत्त्व विभागाच्या १२ कर्मचाऱ्यांची टीम यासाठी कार्यरत आहे. पावसामुळे कामात व्यत्यय येत असला तरी युद्धपातळीवर साफसफाई सुरू आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पर्यटकांसाठी किल्ला खुला करण्याच्या दृष्टीने विभागाकडून तयारी सुरू असल्याची माहिती सहाय्यक संवर्धक पुरातत्त्व विभागाचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी दिली.
पुरातत्त्व विभागाचे बहुउद्देशीय कर्मचारी प्रकाश घुगरे यांच्यासह १२ कर्मचाऱ्यांकडून किल्ल्याच्या अंतर्गत भागाची स्वच्छता केली जात आहे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.
दरवर्षी देश-विदेशातून सुमारे सहा ते सात लाख पर्यटक जंजिरा किल्ल्याला भेट देतात. किल्लादर्शन बंद असल्याने स्थानिक पर्यटन व्यवसायावरही परिणाम होतो. राजपुरी गावातील सुमारे १५० कुटुंबांना शिडाच्या तसेच इंजिन बोटींच्या माध्यमातून रोजगार मिळतो. मेअखेरपासून पावसाळ्यात किल्ला बंद ठेवण्यात येतो. या काळात तटबंदीलगत आणि अंतर्गत भागात वेली, झाडे-झुडपे आणि गवत वाढल्याने विंचू आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका निर्माण होतो. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जून ते ऑगस्टदरम्यान किल्लादर्शन बंद ठेवण्यात येते. सप्टेंबरअखेर पुन्हा पर्यटन सुरू झाल्यास स्थानिकांच्या रोजगाराला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

पर्यटनावर आर्थिक भिस्त
जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला झाल्यानंतर राजपुरी परिसरातील बोट व्यावसायिकांसह अन्य स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. दरवर्षी लाखो पर्यटक दाखल होत असल्याने किल्ला दर्शनाचा हंगाम स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे सुरक्षिततेच्या उपाययोजनांसह किल्ला वेळेत खुला होण्याकडे पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात डीजेबंदी होणार? मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? विद्यानंद बापटांच्या मराठीचं केलं कौतुक

Alcohol Seized : गोवा राज्यातील विदेशी मद्यसाठा शिरूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केला जप्त; दोन वाहने ताब्यात

Stray Dog Attack : उंब्रज येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा थरार! ८० वर्षीय आजी गंभीर जखमी; चार गायी अन् पाळीव प्राण्यांवर हल्ला

Marathi News Live Updates : ''मला कॅन्सर झाला, ईडीच्या तुरुंगात असताना आजाराची सुरुवात'', संजय राऊतांचा मोठा खुलासा

Mumbai Local: मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाडाने ४८ लोकल रद्द; टिटवाळा, खडवलीतील प्रकार; अनेक फेऱ्यांना विलंब

SCROLL FOR NEXT