मुंबई

गणेशोत्सवातील सुरक्षित प्रवासासाठी परिवहन विभाग सज्ज

CD

गणेशोत्सवातील सुरक्षित प्रवासासाठी परिवहन विभाग सज्ज
अवाजवी भाडे, गैरवर्तन आणि नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
पनवेल, ता. ४ (बातमीदार) : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह विविध भागांतून कोकणात दाखल होणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेलने विशेष नियोजन केले आहे. प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणे, गैरवर्तन करणे अथवा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक व मालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे.
गणेशोत्सवात रेल्वे स्थानके, बस स्थानके आणि प्रमुख वाहतूक केंद्रांवर मोठी गर्दी होणार असल्याने रिक्षा व प्रवासी बसचालकांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रिक्षाचालकांनी वाहनांची आवश्यक कागदपत्रे ठेवावीत. तसेच रेल्वे स्थानकांसह प्रमुख थांब्यांवर वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, अशा पद्धतीने वाहने उभी करावीत. शासन किंवा परिवहन विभागाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक भाडे आकारू नये, तसेच प्रवाशांशी उद्धटपणे वर्तन करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. खासगी व प्रवासी बसचालक आणि मालकांनीही बसमधील आपत्कालीन खिडकी किंवा दरवाजा, अग्निशामक यंत्रणा आणि प्रथमोपचार पेटी सुस्थितीत ठेवणे आवश्यक आहे. चालकाने मद्यपान करून अथवा धोकादायक पद्धतीने वाहन चालवू नये. नियमभंग आढळल्यास चालकासह मालकावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

तक्रारींसाठी ई-मेलची सुविधा
जादा भाडे आकारणे, गैरवर्तन किंवा वाहतूक नियमांचा भंग आढळल्यास प्रवाशांनी संबंधित वाहनाचा क्रमांक, प्रवासाचा मार्ग आणि तक्रारीचा तपशील नमूद करून rto.46-mh@gov.in या ई-मेलवर तक्रार नोंदवावी. गणेशोत्सव काळात सर्व वाहतूकदारांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच चाकरमानी भाविकांनीही सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईतील सर्वात श्रीमंत बाप्पा! GSB सेवा मंडळाच्या गणपतीला ७०३ कोटी रुपयांचे विमा संरक्षण

Tejas Express: तेजसच्या प्रवासात मोदकांचा गोडवा! गणेशोत्सवात भाविकांसाठी आयआरसीटीसीची खास मेजवानी

पार्किंगमध्ये स्ट्रेचरवर आईचा मृतदेह अन् बाजूला बसलेला हताश बाप; झाशीच्या वैद्यकीय महाविद्यालयात हृदयद्रावक घटना

Marathi News Live Updates : वाद, चर्चा थांबवा, उत्सवाकडे लक्ष केंद्रित करा, गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या एकमेकांना सूचना

Maratha Reservation : सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आष्टामोड येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन

SCROLL FOR NEXT