मुंबई

गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत पोलिसांची बैठक

CD

गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत पोलिसांची बैठक
सुरक्षित, शिस्तबद्ध गणेशोत्सवासाठी पोलिसांच्या महत्त्वपूर्ण सूचना; डीजे, डॉल्बी व लेझर लाईटला मनाई

पनवेल, ता. ४ (बातमीदार) : आगामी गणेशोत्सव सुरक्षित, शांततेत आणि कायदा-सुव्यवस्थेच्या चौकटीत पार पडावा, याकरिता पनवेल शहर पोलिस आणि कळंबोली पोलिसांच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. पनवेल येथील मंथन हॉलमध्ये पार पडलेल्या या बैठकीस शहरातील सुमारे ४५ ते ५० गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पोलिस उपायुक्त परिमंडळ-३ पनवेल रश्मी नांदेडकर, सहाय्यक पोलिस आयुक्त पनवेल मयूर भुजबळ आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. या वेळी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका, सिडको, अग्निशमन विभाग, महावितरण तसेच वाहतूक शाखेकडून आवश्यक त्या परवानग्या घेऊनच मंडप उभारावेत, अशा सूचना देण्यात आल्या. राज्य शासनाने मंडप उभारणीसंदर्भात निश्चित केलेल्या नियम व अटींचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. गणेशमूर्तीची स्थापना झाल्यानंतर मंडपाच्या ठिकाणी दिवस-रात्र स्वयंसेवकांची नियुक्ती करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. तसेच डीजे, डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईटचा वापर करू नये, कोणतेही आक्षेपार्ह देखावे किंवा फलक लावू नयेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. दर्शनासाठी महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगा ठेवण्याबाबतही मंडळांना मार्गदर्शन करण्यात आले. गणेशमूर्तीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका शक्यतो रस्त्याच्या एका बाजूने काढाव्यात तसेच गर्दी नियंत्रणासाठी आवश्यकतेनुसार रस्सीचा वापर करावा, असे सांगण्यात आले. विसर्जनासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची आरटीओकडून तपासणी करून घ्यावी आणि चालकाचा वाहन परवाना तपासावा, अशाही सूचना देण्यात आल्या. या वेळी पोलिसांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यावर चर्चा केली. सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

कळंबोलीतही मनाई
कळंबोलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत गणेशोत्सव मंडळांना विविध महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन करताना मंडळांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे तानाजी नारनवर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईतील सर्वात श्रीमंत बाप्पा! GSB सेवा मंडळाच्या गणपतीला ७०३ कोटी रुपयांचे विमा संरक्षण

Tejas Express: तेजसच्या प्रवासात मोदकांचा गोडवा! गणेशोत्सवात भाविकांसाठी आयआरसीटीसीची खास मेजवानी

पार्किंगमध्ये स्ट्रेचरवर आईचा मृतदेह अन् बाजूला बसलेला हताश बाप; झाशीच्या वैद्यकीय महाविद्यालयात हृदयद्रावक घटना

Marathi News Live Updates : वाद, चर्चा थांबवा, उत्सवाकडे लक्ष केंद्रित करा, गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या एकमेकांना सूचना

Maratha Reservation : सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आष्टामोड येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन

SCROLL FOR NEXT