मुंबई

पालघर जिल्ह्यातील वैतरणा नदीवरील पुलाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर

CD

विरार सफाळा रेल्वेला समांतर मोठा पूल उभारल्यास वाढीव, वेती गावांचाही प्रश्न मार्गी लागेल


पालघर, ता. ४ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील वैतरणा नदीवरील वाढीव, वेतीपाडा या गावांना जोडणाऱ्या कायमस्वरूपी पुलाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठवला आहे; मात्र प्रस्तावित पूल आणि त्याचा आराखडा अरुंद असल्याने त्याऐवजी विरार सफाळा मार्गाला जोडणारा मोठा रस्ता व पूल उभारावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यामुळे पालघर व वसई तालुक्यातील अंतर कमी होऊन प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

प्रस्तावित पुलामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, नागरिकांचे आरोग्य, तरुण-तरुणींचा रोजगार आणि दैनंदिन प्रवास यासाठी वाढीव आणि वेतीपाडा या गावांतील नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या पुलासाठी रेल्वे विभागाचे आवश्यक समन्वय साधता येत असून, विविध पर्यायांची तपासणी करण्यात आली आहे. प्रस्तावित पुलाची अंदाजे लांबी ७०० मीटर असून, प्राथमिक अंदाजानुसार त्यासाठी २५ कोटी ९५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
प्रस्तावित पुलाऐवजी विरार ते पालघर असा रेल्वे मार्गाला समांतर रस्ता उभारल्यास स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळू शकतील, अशी अपेक्षा तेथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्रस्तावित पूल अरुंद असल्याने त्याऐवजी दोन वाहने सहजपणे जाऊ शकतील, असा मोठा पूल उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.

सफाळा ते वैतरणा आणि वैतरणा ते विरार या दोन टप्प्यांतील रस्ता व पुलाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार करून शासनाकडे सादर केल्यास वसई व पालघर तालुक्यातील नागरिकांना वाहनाने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून करावा लागणारा प्रवास कमी होईल. सध्या या प्रवासासाठी जवळपास ४० किलोमीटर अंतर अधिक पडत आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून होणारी वाहतूक व त्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी हेदेखील कमी होऊन नागरिकांना तसेच वाहनचालकांना जलद गतीने पोहोचणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर विरार-सफाळा रेल्वेला समांतर मोठा पूल उभारल्यास वाढीव तसेच वेती या गावांचाही प्रश्न मार्गी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav : पुणे जिल्ह्यात सहा दिवस रात्री बारापर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकास परवानगी

Alcohol Seized : गोवा राज्यातील विदेशी मद्यसाठा शिरूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केला जप्त; दोन वाहने ताब्यात

CM Devendra Fadnavis : बजाज फिनसर्व्हच्या मुख्यालयामुळे पुण्‍यात ४० हजार रोजगारांची संधी

Marathi News Live Updates : ''मला कॅन्सर झाला, ईडीच्या तुरुंगात असताना आजाराची सुरुवात'', संजय राऊतांचा मोठा खुलासा

CM Devendra Fadnavis : लोकसहभागानेच ‘डीजे’ चे स्तोम कमी होईल; पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा

SCROLL FOR NEXT