मुंबई

विमानांच्या गर्जनेत घुमतोय मृदंगाचा गजर

CD

विमानांच्या गर्जनेत घुमतोय मृदंगाचा गजर
उलव्यात आधुनिक विकासासोबत सांस्कृतिक परंपरांचा वारसा कायम
उलवे, ता. ४ (बातमीदार) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासामुळे उलवे परिसराचा चेहरामोहरा बदलला असला तरी विस्थापित ग्रामस्थांनी आपल्या संस्कृतीची नाळ घट्ट धरून ठेवली आहे. विमानांचा गजर, उंच इमारती आणि आधुनिक नागरी सुविधांच्या सावलीत मंदिरांमधील हरिपाठ, भजन-कीर्तन, सण-उत्सव आणि वारीची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने सुरू आहे.
विमानतळाच्या उभारणीसाठी उलवे, तरघर, चिंचपाडा, गणेशपुरी, कोंबडभुजे, कोल्हीकोपर यांसह १० गावांचे विस्थापन झाले. कौलारू घरे, शेती आणि गावचे जुने वातावरण मागे पडले; मात्र श्रद्धास्थाने आणि सांस्कृतिक परंपरा नव्या पुनर्वसन क्षेत्रातही जपण्यात आल्या. सार्वजनिक व खासगी मिळून तब्बल ५६ मंदिरांचे स्थलांतर करण्यात आले. या मंदिरांच्या प्रांगणात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण एकत्र येत असल्याने जुन्या चावडीची जागा नव्या सामाजिक संवादाने घेतली आहे.
गणेशोत्सव, दहीहंडी, गोकुळाष्टमी, नवरात्रोत्सव, होळी यांसह विविध सण उत्साहात साजरे होत आहेत. ग्रामस्थ मंडळांकडून आगरी-कोळी लोकपरंपरा, वारकरी संप्रदाय, भजन-कीर्तन आणि पारंपरिक उत्सवांची ओळख नव्या पिढीला करून दिली जात आहे.
ह.भ.प. विठाआई आणि अंबू भोईर, कोल्ही म्हणाले, की नव्या पिढीला आपल्या मूळ गावाची संस्कृती, परंपरा आणि श्रद्धा जाणून घेणे गरजेचे आहे. आम्ही गेली ४० वर्षे वारी करीत असून, प्रत्येक वारीत पांडुरंग आम्हाला नव्याने भेटतो.

आधुनिकतेतही सांस्कृतिक ओळख अबाधित
विमानतळ, रुंद रस्ते आणि उंच इमारतींमुळे परिसराचे स्वरूप बदलले असले तरी मंदिरांतील धार्मिक उपक्रम आणि सण-उत्सवांच्या माध्यमातून ग्रामस्थांनी सामाजिक एकोपा जपला आहे. भौगोलिक गाव हरवले असले तरी नव्या नागरी परिसरात ‘गावपण’ आजही जिवंत असल्याचे चित्र दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav : पुणे जिल्ह्यात सहा दिवस रात्री बारापर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकास परवानगी

Alcohol Seized : गोवा राज्यातील विदेशी मद्यसाठा शिरूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केला जप्त; दोन वाहने ताब्यात

CM Devendra Fadnavis : बजाज फिनसर्व्हच्या मुख्यालयामुळे पुण्‍यात ४० हजार रोजगारांची संधी

Marathi News Live Updates : ''मला कॅन्सर झाला, ईडीच्या तुरुंगात असताना आजाराची सुरुवात'', संजय राऊतांचा मोठा खुलासा

CM Devendra Fadnavis : लोकसहभागानेच ‘डीजे’ चे स्तोम कमी होईल; पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा

SCROLL FOR NEXT