मुंबई

दिघागाव रेल्वे स्थानकाने घेतला मोकळा श्वास

CD

दिघा गाव रेल्वे स्थानकाने घेतला मोकळा श्वास
विनापरवाना गाळ्यावर पालिकेची बुलडोझर कारवाई
तुर्भे, ता. ४ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या दिघा प्रभाग समितीअंतर्गत दिघा गाव रेल्वे स्थानक परिसर आणि पटणी मैदान परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्स व हातगाड्यांवर पालिकेने जेसीबीच्या सहाय्याने धडक तोडक कारवाई केली. गेल्या काही वर्षांपासून स्टेशनबाहेर बेकायदेशीर फेरीवाल्यांचे जाळे पसरले होते. पालिकेच्या या कारवाईमुळे रेल्वे स्थानकाकडे जाणारा मुख्य मार्ग मोकळा झाला असून, प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे व अतिक्रमण उपायुक्त राहुल गेठे यांच्या मार्गादर्शनाखाली दिघा विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रबोधन मवाडे यांच्यासमवेत अभियंता गिरीश मुगेकर, वरिष्ठ लिपिक योगेश खाडे, लिपिक संतोष म्हात्रे, सुरक्षा कर्मचारी योगेश दिवटणकर, मल्हार तारमाळे, आनंद चिकणे, इतर कर्मचारी, रबाळे पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. दिघा गाव रेल्वे स्टेशन, खाऊ गल्ली, पटणी कंपनी ग्राउंड रोड, दिघा तलाव येथे विनापरवाना ठाण मांडून बसलेले चायनीज, भाजी-पोळी केंद्र, पानटपऱ्या अशा खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर धडक कारवाई केल्याने वाहतुकीस होणार अडथळा दूर झाला आहे.

दुकानाआडून गांजाविक्री
मागील आठवड्यात रात्रीच्या सुमारास दिघा गाव रेल्वे स्थानकाबाहेरील पटणी मैदानानजीक फेरीवाल्यांच्या गाड्यांचा आधार घेत रात्रीच्या वेळी गांजाविक्री सुरू असल्याची माहिती रबाळे पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी धाव घेताच गांजाविक्री करणाऱ्या टोळक्यांनी पळ काढला होता. या परिसरात सर्रासपणे एका चायनीजच्या गाळ्यात मद्यप्राशन केल्याच्या तसेच रात्रभर सुरू असणाऱ्या खाद्य पदार्थांच्या गाड्यामुळे नशेडींचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी नागरिकांनी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi साठी BCCI चा मास्टरप्लान! सचिवांचा खुलासा, 'तो केवळ एका सीझनचा स्टार राहू नये...'

Marathi News Live Updates : भारतीय लष्करातील जवानांनी घेतलं पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन

DWIDHA MOVIE REVIEW: वडील आणि मुलीच्या नात्यातील भावनिक गुंतागुंत दाखवणारा, मनाला भिडणारा चित्रपट ‘द्विधा’

Vastu Tips: संध्याकाळ होण्यापूर्वी घरात करा ‘ही’ ३ कामं; घरात राहील सुख-समृद्धी आणि सकारात्मक वातावरण!

Jintur News : जिंतूर तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा; माजी आमदार विजय भांबळे

SCROLL FOR NEXT