मुंबई

‘सकाळ श्रावणसरी’त मराठमोळ्या संस्कृतीचा जागर

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : श्रावणाच्या सरी, पारंपरिक वेशभूषा आणि मराठमोळ्या संस्कृतीचा सुगंध अशा उत्साही वातावरणात डोंबिवलीत ‘सकाळ श्रावणसरी २०२६’ हा सांस्कृतिक सोहळा रंगला. नऊवारी साडीच्या पारंपरिक थाटात सजलेल्या महिलांच्या उपस्थितीने कार्यक्रमस्थळी जणू महाराष्ट्राच्या लोकपरंपरांचे दर्शन घडले. ‘सकाळ’तर्फे आयोजित कार्यक्रमाला एलजी हिंग मुख्य प्रायोजक, तर महाराष्ट्र बाजारपेठ गिफ्ट पार्टनर म्हणून होते. कार्यक्रमाचे परीक्षण समेळ फूड्‍स प्रा. लि.च्या संचालक पल्लवी समेळ, सामाजिक कार्यकर्ते संजना कदम यांनी केले, तर सूत्रसंचालन निवेदिका धनश्री दामले यांनी केले. अभिनेत्री रसिका धामणकर, नगरसेविका शीतल मंढारी यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली.

शुभमंगल हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात कल्याण-डोंबिवलीसह जोगेश्वरी, वरळी, प्रभादेवी आणि सांताक्रूझ येथून महिला सहभागी झाल्या होत्या. मनोरंजनासोबत आरोग्य जनजागृतीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे यंदाचे पाचवे वर्ष होते. मॉडर्न मंगळागौर, श्रावण क्वीन, उखाणे, पाककला स्पर्धा आणि मराठमोळा फॅशन वॉक यामुळे कार्यक्रमाला उत्साहाची किनार लाभली. फुले, पाने आणि भाज्यांपासून साकारलेल्या आकर्षक दागिन्यांतून महिलांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला.

‘सकाळ श्रावणसरी’ कार्यक्रमात वेगवेगळ्या शहरांतून महिला सहभागी झाल्या. पाककला स्पर्धेत महिलांनी ‘एलजी हिंग’चा वापर करून स्वादिष्ट पदार्थ तयार केले. मंगळागौरचे खेळदेखील उत्कृष्टरीत्या सादर केले.
- मानव सरदा, एलजी हिंग

आजच्या कार्यक्रमातून पाककला, हिंग म्हणजे एलजीच आणि मंगळागौर स्पर्धांतील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग अनुभवता आला. ‘सकाळ श्रावणसरी’ने महिलांच्या कलागुणांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले. विविध वयोगटांतील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष उल्लेखनीय होता.
- संतोष झा, एलजी हिंग

‘सकाळ श्रावणसरी’ कार्यक्रमात सहभागी होऊन खूपच मज्जा आली. मी पहिल्यांदाच मंगळागौरीचे खेळ पाहिले. हा एक वेगळा अनुभव घेतला.
- सुनीता डुंबरे, आर. के. बाजार

स्पर्धेचा निकाल
पाककला : लिना सप्रे (प्रथम), मानसी भडेकर (द्वितीय), शीतल खडके (तृतीय)
हिंग म्हणजे एलजीच : रोहिणी कोठावदे (प्रथम), अनिता येवले (द्वितीय), नारायणी दळवी (तृतीय)
श्रावण क्वीन : मनीषा चितळे (प्रथम), वैशाली गजना (द्वितीय), मधुरा सावंत (तृतीय)
मंगळागौर : साज ह्यो तुझा ग्रुप (प्रथम), स्वामिनी सखी ग्रुप (द्वितीय), गं साजणे ग्रुप (तृतीय)
मराठमोळा फॅशन वाॅक : श्वेता चव्हाण (प्रथम), ज्योत्स्ना पाटील (द्वितीय), नारायणी दळवी (तृतीय)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DWIDHA MOVIE REVIEW: वडील आणि मुलीच्या नात्यातील भावनिक गुंतागुंत दाखवणारा, मनाला भिडणारा चित्रपट ‘द्विधा’

Vastu Tips: संध्याकाळ होण्यापूर्वी घरात करा ‘ही’ ३ कामं; घरात राहील सुख-समृद्धी आणि सकारात्मक वातावरण!

Marathi News Live Updates : भारतीय लष्करातील जवानांनी घेतलं पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन

Jintur News : जिंतूर तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा; माजी आमदार विजय भांबळे

मुंबईतील सर्वात श्रीमंत बाप्पा! GSB सेवा मंडळाच्या गणपतीला ७०३ कोटी रुपयांचे विमा संरक्षण

SCROLL FOR NEXT