रेंटल हाउसिंग पॉलिसीचे पोर्टल टीसीएस बनवणार
म्हाडा-टीसीएसमध्ये लवकरच एमओयू होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : भाड्याने घर देणे आणि घेणे सोपे व्हावे म्हणून म्हाडाकडून रेंटल हाउसिंग पाॅलिसी तयार करून त्याचा मसुदा सरकारला सादर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर रेंटल हाउसिंगसाठी आवश्यक असलेले पोर्टल टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) बनवणार आहे. त्याबाबत म्हाडा आणि टीसीएसमध्ये लवकरच सामंजस्य करार (एमओयू) होणार आहे. पुढील दोन-तीन महिन्यांत हे पोर्टल तयार केले जाणार आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईत घर खरेदी करणे खिशाला परवडत नाही. तसेच अनेकदा नोकरदार, विद्यार्थ्यांना घर विकत घेणे शक्य नसल्याने त्यांच्याकडून भाड्याच्या घरांना पसंती दिली जाते; मात्र अनेकदा भाड्याचे घर मिळवणे कठीण असते. तसेच केंद्र सरकारच्या नियोजनानुसार मुंबईसह एमएमआरमध्ये ग्रोथ हब उभारले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात येथे मोठ्या प्रमाणात भाड्याच्या घरांना मागणी असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकाराने म्हाडाच्या माध्यमातून रेंटल हाउसिंग पाॅलिसी तयार केली असून त्याला मंजुरीची प्रतीक्षा आहे. त्याच जोडीला आता भाड्याने घरे घेता यावीत, त्याबाबतची उपलब्धता, किती भाडे आहे, घर कोणाचे आहे, किती कालावधीसाठी भाड्याने मिळणार आदी माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी म्हणून म्हाडा टीसीएसच्या माध्यमातून स्वतंत्र पोर्टल तयार करणार आहे. त्याबाबत म्हाडा आणि टीसीएसच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली असून त्याबाबतचा करार केला जाणार असल्याची माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.