वडाळा-कासारवडवली मेट्रो-४च्या कामाला वेग येणार
एमएमआरडीएला ६६६ कोटी रुपये केएफडब्ल्यू बँकेकडून मिळणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबई मेट्रो-४ वडाळा घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली आणि मेट्रो-४ अ कासारवडवली-गायमुख या मेट्रो मार्गिकेच्या कामाला आणखी वेग येणार आहे. या मेट्रो प्रकल्पासाठी केएफडब्ल्यू बँकेकडून ६६४ कोटी रुपये कर्जरूपाने एमएमआरडीएला मिळणार आहेत. ही रक्कम वळती करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सध्या अंतिम टप्प्यात असलेली कामे पूर्ण करण्यास चालना मिळणार आहे.
एमएमआरडीएकडून ३५ किलोमीटर लांबीची वडाळा-कासारवडवली-गायमुख मेट्रो मार्गिका सुमारे १५ हजार कोटी रुपये खर्चून उभारली जात आहे. त्यासाठी आवश्यक निधी एमएमआरडीएला स्वनिधी, राज्य शासनाचे सहाय्य व बाह्य वित्तीय संस्थेचे कर्ज या माध्यमातून उभारावा लागत आहे. त्यानुसार केएफडब्ल्यू बँक या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले आहे. मात्र सुरुवातीला एमएमआरडीएने आवश्यक खर्च करून त्याची बिले प्रतिपूर्तीसाठी संबंधित वित्तीय संस्थेकडे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार एमएमआरडीएने सादर केलेल्या बिलाच्या अनुषंगाने केएफडब्ल्यू बँकेने ६६६ कोटी रुपये केंद्र शासनामार्फत राज्याच्या एकत्रित निधीमध्ये जमा करण्यात आला होता. तो एमएमआरडीएला देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.