मुंबई

बेस्ट कामगारांच्या मागण्यांचा प्रस्ताव

CD

बेस्ट कामगारांच्या मागण्यांचा प्रस्ताव
लवकरच पालिकेच्या मंजुरीसाठी सादर होणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः बेस्ट उपक्रमातील कायम कामगार तसेच वेट लिज कामगारांच्या मागण्यांबाबत बेस्ट उपक्रमाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. बेस्ट कामगार संघटनेसोबत चर्चा करून प्रस्ताव तयार केला जाईल. हा प्रस्ताव पालिकेच्या मंजुरीसाठी लवकरच सादर करण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट कामगार नेते शशांक राव यांनी दिली.
बेस्ट कामगारांच्या विविध प्रश्नांवर कामगार नेते शशांक राव यांनी नुकतेच उपोषण केले होते. बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव, बेस्टच्या महाव्यवस्थापक यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. मुंबई महापालिकेचा बेस्ट उपक्रमाशी संबंधित ‘क’ अर्थसंकल्पाचे विलीनीकरण पालिकेच्या ‘अ’ अर्थसंकल्पात तातडीने करावे, बेस्ट कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी व महापालिका समकक्ष वेतनमान याचा समावेश असलेला २०१६ ते २०२१ व २०२१ ते २०२६चा प्रलंबित वेतन करार तातडीने करण्यात यावा, बेस्ट उपक्रमाच्या विद्युत पुरवठा विभागात २०१० व २०२४ मध्ये व नंतर कायम करण्यात आलेल्या हंगामी कामगारांना ते सेवेत दाखल झालेल्या प्रथम दिवसापासून पूर्वलक्षी प्रभावाने नोकरीत कायम असल्याचे मानून सुधारित वेतन निश्चित करून त्यांच्या वेतनातील विसंगती दूर करावी, वेट लौज कर्मचाऱ्यांना कायद्याप्रमाणे ‘समान कामाला समान दाम’ लागू करण्यात यावे, आदी मागण्यांचा प्रस्ताव लवकरच बेस्ट प्रशासनातर्फे पालिकेला सादर करण्यात येणार आहे. या प्रमुख मागण्यांच्या सोडवणुकीवर आम्ही ठाम असून त्या मागण्या मार्गी लागतील आणि आम्हाला यश मिळेल, असे राव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asim Munir: पाकिस्तानात पहिल्यांदाच असं घडलं; आसीम मुनीर यांच्या हातात सुपर पॉवर, देशाचं सत्ताकेंद्रच बदललं!

अमली पदार्थांची टीप दिल्याच्या संशयातून नगरसेवकाच्या घरावर गोळीबार; ७ आरोपी अटकेत, ५० हजारांची घेतली होती ‘सुपारी’

Pune Fraud News : हेलो, मी प्रिन्सिका जोशी बोलतेय....; मुलीच्या नावाने ‘स्नॅपचॅट’वर मैत्री अन्‌ दीड लाखाच्‍या 'क्रिप्टोकरन्सी'ला गंडा

Hingoli News : मनोज जरांगे पाटील यांची आमदार राजू नवघरे यांनी घेतली भेट; उपोषणस्थळी जाऊन तब्येतीची केली विचारपूस

Pune News : विद्यानंद बापट यांच्‍यावर हल्‍ला प्रकरणातील आरोपी संतोष चव्‍हाणला एक दिवसाची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT