मुंबई

निवृत्त न्या. अभय ओक यांच्या म्हणण्यानुसार...

CD

निवृत्त न्या. अभय ओक यांच्या म्हणण्यानुसार...
- न्यायालयांमध्ये प्रलंबित खटल्यांचा डोंगर वाढत असताना त्यासाठी केवळ न्यायाधीशांना जबाबदार धरणे योग्य नाही. न्यायव्यवस्थेवरील वाढता ताण हा प्रामुख्याने अपुरे मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांचा परिणाम आहे.

- २००२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दहा लाख लोकसंख्येमागे ५० न्यायाधीश नियुक्ती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. त्या आदेशांची पूर्तता अद्याप राज्य सरकारने केलेली नाही. त्यामुळे आजही ही संख्या २३ ते २४ कमी आहे. या उलट काळात लोकसंख्या वाढली आणि घरगुती हिंसाचारासह अनेक नवे कायदे अस्तित्वात आल्याने न्यायालयांवरील खटल्यांचा भार आणखी वाढला.

- न्यायालयीन इमारती, न्यायालयीन कक्ष, कर्मचारी, संगणक आणि अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे काम आहे. महाराष्ट्रातही न्यायाधीशांची संख्या आठ हजारांनी वाढविण्याची मागणी करण्यात आली; मात्र प्रत्यक्षात अपेक्षित वाढ झाली नाही.

- दिवाणी न्यायालयात एका दिवसात १०० ते १५० प्रकरणे पटलावर असतील, तर प्रत्येक प्रकरणाला पुरेसा वेळ देऊन न्याय देणे कोणत्याही न्यायाधीशाला मानवी मर्यादेत शक्य नाही. त्यामुळे न्यायाधीशांच्या सुट्ट्यांवर प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा ते त्या काळात किती काम करतात, याचाही विचार झाला पाहिजे. न्यायव्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी न्यायाधीशांची संख्या आणि पायाभूत सुविधा तातडीने वाढविणे हाच खरा उपाय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dahi Handi Accident Mumbai : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला

ऑनलाइन Grocery खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, काय बदलणार?

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना जन्माष्टमीची भेट! महागाई भत्त्यात ६० टक्के वाढ, सरकार मोठा निर्णय घेणार

Marathi News Live Updates: पंतप्रधानांचा फोटो काढल्याप्रकरणी मनसेचे आशिष साबळे प्रशांत कनोजिया, विक्रांत कनोजियांना जामीन मंजूर

झीरम घाटी नक्षलवादी हल्ला प्रकरणात NIA कोर्टाने १० आरोपींना ठरवलं दोषी; छत्तीसगड काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांचं हत्याकांड प्रकरण

SCROLL FOR NEXT