मुंबई

सरळगाव एमआयडीसीच्या ड्रोन सर्वेक्षणाला सात गावांचा तीव्र विरोध !

CD

सरळगाव एमआयडीसीच्या
ड्रोन सर्वेक्षणाला विरोध!
१८ वर्षांपासून प्रलंबित भूसंपादनाला ग्रामस्थांचा आक्षेप

मुरबाड ता. ५ (वार्ताहर)ः मुरबाड तालुक्यातील सरळगाव परिसरात प्रस्तावित एमआयडीसीसाठी सरळगावसह नागाव, वडवली, दहिवली, मानिवली, माजगाव आणि नेवालपाडा या सात गावांतील सुमारे १,०२९ हेक्टर जमीन संपादित करण्याच्या हालचालींना ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. तब्बल १८ वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून, ड्रोनच्या माध्यमातून जमिनीच्या सर्वेक्षणाची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाल्याने सातही गावांतील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी अधिनियम १९६१ मधील संबंधित तरतुदींनुसार आरक्षित जमिनीवर ठरावीक कालावधीत कार्यवाही न झाल्यास आरक्षणाबाबत पुनर्विचार होणे आवश्यक आहे. पाच वर्षांच्या कालावधीत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसेल तर आरक्षण रद्द होण्याची तरतूद लागू होत असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. त्यामुळे तब्बल १८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रस्तावावर आता पुन्हा सर्वेक्षण करून भूसंपादनाची प्रक्रिया पुढे नेण्यास ग्रामस्थांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सरळगाव एमआयडीसीसाठी ड्रोन सर्वेक्षणाच्या माध्यमातून जमिनीची मोजणी अथवा भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास त्याला सातही गावांतील ग्रामस्थांकडून प्रखर विरोध केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. ‘‘आमच्या जमिनीवर कोणत्याही परिस्थितीत ड्रोन सर्वेक्षण होऊ देणार नाही. १८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणात आता पुन्हा मोजणी करून भूसंपादनाचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडू. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू,’’ असा आक्रमक पवित्रा सातही गावांतील ग्रामस्थांनी घेतला आहे.
शेती, घरजमीन आणि गावांच्या भवितव्याशी संबंधित हा प्रश्न असल्याने प्रशासनाने ग्रामस्थांची भूमिका जाणून घेतल्याशिवाय कोणतीही कार्यवाही करू नये, अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सरळगाव एमआयडीसीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आगामी काळात प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रशासनाने तातडीने ग्रामस्थांशी चर्चा करून कायदेशीर स्थिती स्पष्ट करावी आणि ड्रोन सर्वेक्षणाची प्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणी सातही गावांतील ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Chief of Defence Forces : पाकिस्तानची नवी खेळी; लष्करी व्यवस्थेत ऐतिहासिक सत्ताबदल, असीम मुनीर बनले ‘चीफ ऑफ डिफेन्स'

Google Android: गुगलने आणले ५ हाय-टेक फीचर्स! कारमध्ये फोन वापरताना चक्कर येणे बंद; 'मोशन असिस्ट' फीचर कसे करेल काम?

छबीदार छबी मी तोऱ्यात उभी! यंदाची दहीहंडी तिने गाजवली; गौतमी पाटील नाही मग ही नवी डान्सर आहे तरी कोण?

Marathi News Live Updates: एक हजार शाळा मॉडेल स्कूल करण्याचं उद्दिष्ट- सुनेत्रा पवार

Dahi Handi Accident Mumbai : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला

SCROLL FOR NEXT