मुंबई

दहीहंडी जीवघेणी स्पर्धा होऊ नये उत्साहासोबत सावधगिरी बाळगा : एकनाथ शिंदे

CD

दहीहंडी जीवघेणी स्पर्धा नको
उत्साहासोबत सावधगिरी बाळगा : एकनाथ शिंदे

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : दहीहंडीच्या थरांची उंची वाढत असताना गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. हंडी फोडण्याच्या उत्साहात जीव धोक्यात घालण्याची गरज नाही. दहीहंडी हा महाराष्ट्राची परंपरा आणि सांघिक शक्तीचे दर्शन घडविणारा उत्सव आहे. त्यामुळे स्पर्धेपेक्षा सुरक्षिततेला महत्त्व देत हा उत्सव साजरा करा. तुमचे आई-वडील तुमची वाट पाहात आहेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.
ठाण्यातील टेंभीनाका येथे धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या दहीहंडी उत्सवाला आजही विशेष महत्त्व आहे. दिघे यांच्या निधनानंतरही या उत्सवाची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. टेंभीनाका मित्रमंडळाच्या माध्यमातून दरवर्षी दहीहंडी साजरी केली जाते. यंदाच्या उत्सवात सहभागी झालेल्या गोविंदा पथकांची भेट घेत शिंदे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी खासदार नरेश म्हस्के यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. दहीहंडीच्या निमित्ताने गोविंदांच्या कौशल्याचे आणि एकजुटीचे प्रदर्शन होते. एकावर एक थर रचून हंडी फोडताना प्रत्येक गोविंदाची भूमिका महत्त्वाची असते. यंदा दहा थर रचले जात असले तरी केवळ अधिक उंच थर लावण्याच्या प्रयत्नात अनावश्यक धोका पत्करू नका, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
……………
साहसी खेळाला सुरक्षिततेची जोड
साहसी खेळाचा दर्जा मिळाल्याने याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. गोविंदांना सार्वजनिक सुट्टी, विमा संरक्षण यांसारखे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच प्रो-गोविंदा स्पर्धांच्या माध्यमातून खेळाला व्यापक व्यासपीठ मिळाले असून, गोविंदांच्या कौशल्याला नवी ओळख मिळत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. उत्सवाचा आनंद घेताना दुखापत होणार नाही याची खबरदारी घ्यावी. ‘उत्साह कितीही असला तरी जीवापेक्षा मोठे काहीही नाही,’ या भावनेतून दहीहंडी साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
………………..
टेंभीनाक्यावर मानाची हंडी
ठाण्याच्या दहीहंडी उत्सवाला धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्यामुळे वेगळी ओळख निर्माण झाली आहे. शहरातील विविध गोविंदा पथके येथे येऊन सलामी देतात आणि त्यानंतर इतर ठिकाणच्या दहीहंडी उत्सवांकडे रवाना होतात. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दहीहंडी यांसारखे सार्वजनिक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्याची परंपरा आनंद दिघे यांनी ठाण्यात रुजवली. या उत्सवांमधून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे काम झाले आणि हीच उत्सवाची परंपरा पुढे महाराष्ट्राच्या विविध भागांत पोहोचली, असे शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Chief of Defence Forces : पाकिस्तानची नवी खेळी; लष्करी व्यवस्थेत ऐतिहासिक सत्ताबदल, असीम मुनीर बनले ‘चीफ ऑफ डिफेन्स'

Google Android: गुगलने आणले ५ हाय-टेक फीचर्स! कारमध्ये फोन वापरताना चक्कर येणे बंद; 'मोशन असिस्ट' फीचर कसे करेल काम?

छबीदार छबी मी तोऱ्यात उभी! यंदाची दहीहंडी तिने गाजवली; गौतमी पाटील नाही मग ही नवी डान्सर आहे तरी कोण?

Marathi News Live Updates: धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी उत्सवाला सुरुवात

Dahi Handi Accident Mumbai : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला

SCROLL FOR NEXT