मुंबई

नागेशच्या उपचारांची जबाबदारी प्रताप सरनाईक यांच्याकडे

CD

गोविंदा नागेशच्या उपचाराचा खर्च उचलणार
प्रताप सरनाईक यांची घोषणा

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : दहीहंडीच्या थरावर चढताना २००९मध्ये जखमी झालेले नागेश भोईर गेली १७ वर्षे अंथरुणाला खिळून आहेत. त्यांच्या उपचारांचा खर्च पेलणे अशक्य होत असल्याने कुटुंबाने उपचाराकरिता सरकारकडे मदत मागितल्याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने शनिवारी (ता. ५) प्रसिद्ध केले. यानंतर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज नागेशच्या उपचारांचा खर्च उचलणार असल्याची घोषणा केली.
दहीहंडीच्या थरावर चढताना नागेश यांच्या डोळ्यांसमोर विजयाचे स्वप्न होते; मात्र काही क्षणांतच तो थर कोसळला. वयाच्या २४ व्या वर्षी झालेल्या अपघाताने नागेश यांचे आयुष्य बदलून टाकले. मणक्याच्या गंभीर दुखापतीनंतर गेली १८ वर्षे ते अंथरुणावर आहेत. मणक्याला झालेल्या दुखापतीमुळे नागेश यांना सातत्याने वैद्यकीय उपचारांची गरज भासते. औषधोपचारांसोबत फिजिओथेरपी सुरू असून, प्रकृतीनुसार साधारण दोन महिन्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते. गेली अनेक वर्षे हा खर्च कुटुंबासाठी मोठे आव्हान ठरत आहे. अपघातानंतर सुरुवातीच्या काळात मित्र आणि परिचितांनी मदतीचा हात पुढे केला; मात्र वर्षामागून वर्षे गेली आणि मदतीचे हात कमी होत गेले. सध्या काही मोजके मित्र औषधोपचारासाठी मदत करीत असले तरी उपचारांचा वाढता खर्च भागवणे कठीण झाले. आपण ज्या रुग्णालयात उपचार घेतो त्या उपचारांचा खर्च शासनाने उचलावा, अशी विनंती त्यांनी केली होती.
दरम्यान, नागेश यांच्या संघर्षाची दखल घेत प्रताप सरनाईक यांनी मदतीचा निर्णय घेतला. वर्तकनगर येथे संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवादरम्यान गोविंदा पथकांशी संवाद साधताना सरनाईक यांनी नागेश यांच्या उपचारांचा संपूर्ण खर्च उचलणार असल्याची घोषणा केली. या घोषणेमुळे गेल्या १८ वर्षांपासून उपचारांच्या खर्चाची चिंता वाहणाऱ्या नागेश आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बनावट प्रमाणपत्रे देऊन पुणे पोलिस दलात १९ उमेदवार भरती झाल्याचे उघडकीस; दोघांना अटक

IND vs PAK Asia Cup: ना हस्तांदोलन, ना नजरेला नजर.. हरमनप्रीत कौरचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टॉसच्या वेळीच उतरवला पाकिस्तानचा माज

Bhoom News : ईटच्या सुपुत्र डॉ. किरण प्रकाश झरकर यांचा राष्ट्रपतीं द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते दिल्ली येथे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव

Ketan Agarwal case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तिसरा आरोपी अटकेत! कोण आहे रितेश हांगे? गुन्ह्यातला मास्टरमाईंड बीडचा?

Manchar News : २५ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू, दीड महिन्यापूर्वी झालेलं लग्न; पत्नीसह कुटुंबावर दुःखाचा डोंगर

SCROLL FOR NEXT