मुंबई

आसनगांव रेल्वे स्थानक प्रबंधकांना संतप्त प्रवाशांचा घेराव

CD

आसनगावमध्ये रेल्वे प्रवासी संतप्त
स्थानक प्रबंधकांना घेराव; प्रवासाची सोय करण्याची मागणी
शहापूर, ता. ५ (वार्ताहर) : मध्य रेल्वेच्या टिटवाळा स्थानकात सुरू असलेल्या मेगाब्लॉकमुळे संतप्त प्रवाशांनी शनिवारी (ता. ५) आसनगाव स्थानक प्रबंधकांना घेराव घालत रेल्वे प्रशासनाला जाब विचारला. मेगाब्लॉकमुळे मेल-एक्सप्रेस गाड्यांना आसनगाव येथे थांबा देऊन पुढील प्रवासाची सोय करावी, अशी जोरदार मागणी या वेळी प्रवाशांनी केली. रेल्वे संघटनेनेदेखील याबाबत लक्ष वेधले असून, सोमवारपासून याबाबत नियोजन केले जाईल, असे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले.
टिटवाळा स्थानकातील ट्रॅक शिफ्टिंग आणि फलाट लांबी वाढविण्याच्या कामासाठी सुरू असलेल्या मेगाब्लॉकचा सर्वाधिक फटका कसारा, खर्डी, आटगांव, कामशेत, उंबरमाळी, आसनगाव, शहापूर परिसरातील रेल्वे प्रवाशांना बसत असताना, त्यासाठी पर्यायी वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात मध्य रेल्वे प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांच्या सोयीचे नियोजन करण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असतानाही प्रत्यक्षात लोकलच्या वेळापत्रकाचा पुरता बोजवारा उडाला असल्याचा आरोप कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर्स वेल्फेअर असोसिएशनने केला आहे.
मेल-एक्सप्रेस गाड्या असतानाही त्यांना थांबा दिला जात नसल्याने संताप अनावर झालेल्या प्रवाशांनी आसनगाव स्थानक प्रबंधक सुहासकुमार मणियार यांना घेराव घालत मेल-एक्स्प्रेस गाड्यांना आसनगाव स्थानकात थांबा द्यावा, अशी मागणी केली. त्यावर सोमवारपासून व्यवस्थित नियोजन केले जाईल, असे आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले असल्याचे रेल्वे संघटनेचे सचिव उमेश विशे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhash Chandra: सुभाष चंद्रा यांच्यावर सीबीआयकडून फसवणुकीचा गुन्हा; 'एलआयसी'च्या तक्रारीवरुन मोठी कारवाई

Pakistan Chief of Defence Forces : पाकिस्तानची नवी खेळी; लष्करी व्यवस्थेत ऐतिहासिक सत्ताबदल, असीम मुनीर बनले ‘चीफ ऑफ डिफेन्स'

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना बाप्पा पावणार! गणेशोत्सवात महिलांना मिळणार ३,०००? योजनेबाबत नवी अपडेट समोर

Marathi News Live Updates: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रितेश हांगे नावाच्या तरुणाला अटक

Google Android: गुगलने आणले ५ हाय-टेक फीचर्स! कारमध्ये फोन वापरताना चक्कर येणे बंद; 'मोशन असिस्ट' फीचर कसे करेल काम?

SCROLL FOR NEXT