स्वराज्य दहीकाला उत्सवात नारीशक्तीचा सन्मान
महिला गोविंदांच्या हस्ते दहीहंडी फोडून उत्सवाचा शुभारंभ
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ५ ः दीपेश म्हात्रे फाउंडेशन व भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य ‘स्वराज्य दहीकाला उत्सव २०२६’ उत्साहात झाला. यंदाच्या उत्सवात दहीहंडीची सुरुवात महिला गोविंदांच्या हस्ते करून ‘नारीशक्ती सन्मान’ या उपक्रमातून महिला शक्तीला विशेष मान देण्यात आला.
निर्मल युथ फाउंडेशनच्या महिला गोविंदांच्या हस्ते शनिवारी (ता. ५) सकाळी दहीहंडी फोडण्यात आली. महिला गोविंदांनी उत्साहाने सहभाग घेत दहीहंडी फोडताच उपस्थितांनी जल्लोष केला. महिलांच्या सहभागातून महिला सक्षमीकरण, आत्मविश्वास आणि नारीशक्तीच्या सन्मानाचा संदेश देण्यात आला.
दीपेश म्हात्रे फाउंडेशनचे अध्यक्ष दीपेश म्हात्रे तसेच भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, दिवसभरात सुमारे १०० गोविंदा पथकांनी स्वराज्य दहीकाला उत्सवातील हंडीला सलामी दिली. विविध भागांतून आलेल्या गोविंदा पथकांच्या सहभागामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ढोल-ताशांचा गजर, गोविंदा पथकांचा उत्साह आणि नागरिकांची गर्दी यामुळे संपूर्ण परिसर दहीहंडीच्या जल्लोषात रंगून गेला.
‘ड्रग्ज फ्री इंडिया’ जनजागृती मोहीम
‘ड्रग्ज फ्री इंडिया’ अर्थात ‘अमली पदार्थमुक्त भारत’ या जनजागृती मोहिमेलाही सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती करीत युवा पिढीने व्यसनांपासून दूर राहावे, असा संदेश देण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविरोधात जनजागृती करण्यात आली. युवा पिढीने व्यसनापासून दूर राहून शिक्षण, क्रीडा आणि सकारात्मक उपक्रमांकडे वळावे, असा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.