मुंबई

दहीहंडी उत्सवांत सेलिब्रिटींची मांदियाळी

CD

दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी

मुंबई, ता. ५ : जन्माष्टमीच्या निमित्ताने मुंबईत दहीहंडीचा जल्लोष रंगला असताना यंदा गोविंदांच्या थरांसोबतच सेलिब्रिटींच्या उपस्थितीचीही चर्चा झाली. दहीहंडी उत्सवांमध्ये कलाकारांना बोलावून त्यांच्याकडून नृत्य, गाणी किंवा विशेष उपस्थिती करून घेण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षांत वाढला आहे. त्यासाठी लोकप्रिय कलाकारांना लाखो रुपयांचे मानधन दिले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दहीहंडी आता केवळ गोविंदा पथकांच्या थरांपुरती मर्यादित न राहता मनोरंजनाचा मोठा इव्हेंट बनला आहे.
घाटकोपर येथील अमृतनगरमधील दहीहंडीला रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनी हजेरी लावली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम प्रियदर्शिनी इंदलकर आणि रोहित मानेही या सोहळ्यात सहभागी झाले. बोरिवलीतील मागाठाणे येथील दहीहंडीमध्ये अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी गाणी सादर केली, तर अभिनेता गोविंदा यांनी नृत्य करीत उपस्थितांचे मनोरंजन केले. संजय दत्त, राकेश बेदी, सिद्धार्थ जाधव आणि मल्लिका शेरावत यांचीही या सोहळ्याला उपस्थिती होती. मल्लिकाने आपल्या गाण्यांवर नृत्य करीत वातावरणात रंग भरला. घाटकोपर पूर्व येथील शिवसेना नगरसेवक किरण लांडगे यांच्या दहीहंडीला अभिनेता दिव्येंदू शर्मा, अभिनेत्री आयशा खान, अमृता खानविलकर, आफताब शिवदासानी, रॅपर सांबाता आणि पार्थ भालेराव यांनी हजेरी लावली. घाटकोपर येथील राम कदम यांच्या दहीहंडीला अभिनेते जितेंद्र कपूर, उपासना सिंग, राकेश बेदी, रजत बेदी, गौतमी पाटील आणि ओंकार भोजने उपस्थित होते, तर वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे इंद्रभान तिवारी यांच्या दहीहंडी उत्सवात अमृता खानविलकर सहभागी झाली. कलाकारांच्या सहभागामुळे दहीहंडीच्या उत्साहात मनोरंजनाची भर पडत असून, लाखोंच्या मानधनावर सेलिब्रिटींना आमंत्रित करण्याची संस्कृती या उत्सवांना नव्या प्रकारचे ग्लॅमर देताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Asia Cup: पाकिस्तानच्या २८ धावांत १० विकेट्स! भारतासमोर शेजाऱ्यांनी गुडघे टेकले, T20 तील लाजीरवाणी कामगिरी

पाकिस्ताननं आता 'नापाक कृत्य' करण्याचा प्रयत्न केल्यास...; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थेट इशारा, नेमकं काय म्हणाले?

Mahabhumi Stack Maharashtra : जमिनीची माहिती आता एका क्लिकवर; ‘महाभूमी स्टॅक’मुळे व्यवहार पारदर्शक, ७/१२, नकाशा, फेरफार फसवणुकीला बसणार आळा

Pune News : बनावट प्रमाणपत्रे देऊन पुणे पोलिस दलात १९ उमेदवार भरती झाल्याचे उघडकीस; दोघांना अटक

IND vs PAK Asia Cup: ना हस्तांदोलन, ना नजरेला नजर.. हरमनप्रीत कौरचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टॉसच्या वेळीच उतरवला पाकिस्तानचा माज

SCROLL FOR NEXT