मुंबई

नवी मुंबईतील शाळांमध्ये रंगला गोपाळकाला

CD

नवी मुंबईतील शाळांमध्ये रंगला गोपाळकाला
तुर्भे, ता. ६ (बातमीदार) ः भारतीय संस्कृती व परंपरांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी आणि सणांमागील सामाजिक संदेश रुजावा, या उद्देशाने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त नवी मुंबईतील विविध शाळांमध्ये गोपाळकाला व दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवारी (ता. ५) पार पडलेल्या या उत्सवामुळे शाळांचा परिसर कृष्णमय वातावरणाने आणि बालगोपालांच्या आनंदाने भारून गेला होता.
रयत शिक्षण संस्थेच्या मॉडर्न स्कूल, वाशी, भारती विद्यापीठ, सीबीडी बेलापूर यांसह नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. श्रीकृष्ण आणि राधेच्या वेशभूषेत आलेल्या बालगोपालांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक वेशभूषा, कृष्णाच्या जीवनावर आधारित नृत्य, गीते आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाची रंगत वाढवली. दहीहंडी फोडताना विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मानवी मनोऱ्याने विशेष आकर्षण निर्माण केले. ‘एकीचे बळ’ हा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनावर अधोरेखित झाला. या वेळी, अनेक मान्यवर उपस्थित होते.
गोपाळकाल्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना श्रीकृष्णाच्या बाललीला, गोकुळातील परंपरा तसेच जन्माष्टमीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व समजावून सांगण्यात आले. अभ्यासाबरोबरच आपल्या सण-उत्सवांची परंपरा आणि संस्कृती जपण्याची शिकवण विद्यार्थ्यांना मिळाली. या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील शिक्षकांनी विशेष नियोजन केले. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे गोपाळकाला व दहीहंडी उत्सव आनंददायी, शिस्तबद्ध आणि संस्मरणीय ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangare Patil Kunbi Certificate : विश्वास नांगरे -पाटील यांनी कुणबी दाखल्याचा वापर केला? अंतरवालीत ओबीसी आंदोलनात दावा; वातावरण तापलं

९ वर्षांच्या एकटेपणानंतर अपूर्वा नेमळेकरांनी सांगितली मनातली गोष्ट; दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताना म्हणाली...

Yoga For Everyone: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटांसाठी 'ही' आहेत सर्वोत्तम योगासने! आरोग्य अन् मानसिक शांतीची पक्की गॅरंटी...

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Indapur Politics : इंदापुरात पुन्हा पाटील-गारटकर जवळ; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, हर्षवर्धन पाटील भाकरी फिरवणार?

SCROLL FOR NEXT