मुंबई

नाट्यगृहात सत्ताधाऱ्यांच्या ‘वादाचा प्रयोग’

CD

अंबरनाथ, ता. ६ (वार्ताहर) : सुमारे ४५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीला पावसाळ्यात गळती लागल्याने शुक्रवारी विशेष सभा चक्क धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहात घेण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली. मात्र, नाट्यगृहात रंगलेल्या या सभेत विकासकामांपेक्षा सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील आरोप-प्रत्यारोपांचाच ‘प्रयोग’ अधिक रंगला. त्यातच शहरातील कचरा समस्येवरून समीक्षा कंपनी आणि पालिकेच्या आरोग्य विभागावर नगरसेवकांनी जोरदार हल्लाबोल केला.

नव्या प्रशासकीय इमारतीच्या विविध भागांत पावसाचे पाणी गळत असून, प्लास्टर आणि पीओपी निखळण्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. ध्वनिव्यवस्था, वातानुकूलन यंत्रणा यांसारख्या सुविधांमध्येही वारंवार तांत्रिक अडचणी येत असल्याने इमारतीच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे विशेष सभा नाट्यगृहात घ्यावी लागली. सभेत शहरातील कचरा प्रश्न चांगलाच गाजला. कचरा संकलनाच्या समस्येसाठी समीक्षा कंपनीसोबतच आरोग्य विभागातील अधिकारी, मुकादम आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले. कबीर गायकवाड, राजेंद्र वाळेकर, रवींद्र करंजुले, सुभाष साळुंखे आणि विकास सोमेश्वर यांनी कंत्राट रद्द करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, नगराध्यक्षांच्या आदेशाची अधिकारी दखल घेत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राजेंद्र वाळेकर यांनी केली. यावरून भाजप आणि शिवसेना सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे सत्ताधारी गटातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले.
नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील यांनी समीक्षा कंपनी आणि आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. कामात तातडीने सुधारणा न झाल्यास कंत्राटदार आणि दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, सभेत काही विषय मंजूर करण्यात आले. तर अधिकारी उपस्थित नसल्याने काही विषय स्थगित ठेवण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली.

कचराकुंडीमुक्त धोरणाचा बोजवारा
भाजपचे नगरसेवक पवन वाळेकर यांनी समीक्षा कंपनीकडून कचऱ्याच्या वजनात गैरव्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप केला. घंटागाड्या वेळेवर येत नसल्याने अनेक भागांत कचऱ्याचे ढिगारे साचत असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेवक अभिजीत करंजुले यांनी शहर कचराकुंडीमुक्त करण्याच्या धोरणाचा बोजवारा उडाल्याचे सांगत शहरातील सुमारे २१० कचराकुंड्या आणि बंदी असलेल्या प्लास्टिकमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाल्याचे नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक?; देशातील सर्व मत्र्यांचे मागवले वर्क बुक; उद्याच्या बैठकीत होणार झाडाझडती

Dial 112 False Alert : दारूच्या नशेत ‘डायल ११२’ वर खोटी माहिती; पोलिस पोहोचले अन् सापडली अवैध दारू, लोहारा पोलिसांत गुन्हा

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Marathi News Live Updates : अंतरवाली सराटीत OBC उपोषणासाठी स्टेजला पोलिसांचा नकार

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

SCROLL FOR NEXT