मुंबई

नेरुळ आरटीओ कार्यालयात २०० चालकांना प्रमाणपत्रांचे वाटप

CD

नेरूळ आरटीओ कार्यालयात २०० चालकांना प्रमाणपत्रांचे वाटप

नेरूळ, ता. ६ (बातमीदार) ः नेरूळ येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सुमारे २०० रिक्षा-टॅक्सीचालकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. अंकिता मोटार ट्रेनिंग स्कूल आणि नवी मुंबई रिक्षाचालक- मालक सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

रिक्षा-टॅक्सी चालविण्याच्या दैनंदिन धावपळीतून वेळ काढून चालकांनी जिद्दीने मराठी भाषा शिकून परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांच्या या प्रयत्नांचे नवी मुंबईच्या महापौर सुजाता सूरज पाटील यांनी कौतुक केले. मराठी भाषा आत्मसात करण्यासाठी चालकांनी घेतलेली मेहनत आणि दाखविलेली शिकण्याची इच्छा ही निश्चितच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी भाषा अवगत झाल्यामुळे प्रवाशांशी होणारा संवाद अधिक सुलभ होण्यास मदत होईल. तसेच चालक आणि प्रवासी यांच्यातील भाषिक आपलेपणा वाढण्यास या उपक्रमाचा फायदा होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमाला नवी मुंबई रिक्षाचालक- मालक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष दिलीप आमले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर, सहाय्यक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंताल, नेरूळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंकज धाडगे यांच्यासह प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangare Patil Kunbi Certificate : विश्वास नांगरे -पाटील यांनी कुणबी दाखल्याचा वापर केला? अंतरवालीत ओबीसी आंदोलनात दावा; वातावरण तापलं

९ वर्षांच्या एकटेपणानंतर अपूर्वा नेमळेकरांनी सांगितली मनातली गोष्ट; दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताना म्हणाली...

Yoga For Everyone: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटांसाठी 'ही' आहेत सर्वोत्तम योगासने! आरोग्य अन् मानसिक शांतीची पक्की गॅरंटी...

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Indapur Politics : इंदापुरात पुन्हा पाटील-गारटकर जवळ; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, हर्षवर्धन पाटील भाकरी फिरवणार?

SCROLL FOR NEXT