मुंबई

‘अब तक ५६’ गोविंदा जखमी

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : ‘गोविंदा आला रे आला...’च्या जल्लोषात दहीकाला उत्सवाची पंढरी म्हणून नावरुपाला आलेले ठाणे शहर शनिवारी (ता. ५) चांगलेच दुमदुमले; मात्र दहीहंडीच्या थराराला यंदा दुखापतीची किनार लागली. मानवी मनोरे रचताना यंदा तब्बल ५६ गोविंदा जखमी झाले असून, गतवर्षीच्या तुलनेत हा आकडा जवळपास दुप्पट झाला आहे. २०२५ मध्ये २७, २०२४ मध्ये २२, तर २०२३ मध्ये २३ गोविंदा जखमी झाले होते.

यंदाच्या ५६ जखमींच्या तुलनेत गतवर्षी २७ जखमी होते. म्हणजेच यंदा तब्बल २९ जखमी अधिक झाले आहेत. २०२४ च्या तुलनेत ३४, तर २०२३ च्या तुलनेत ३३ जखमी अधिक आहेत. त्यामुळे मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदाचा जखमी गोविंदांचा आकडा लक्षणीय वाढला आहे.

कळव्यात सर्वाधिक ३४ जखमींवर उपचार
यंदा जखमी झालेल्या गोविंदांपैकी ३४ जणांवर पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात आले. उर्वरित जखमींवर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचार करण्यात आले. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या शहरातील गोविंदांचाही जखमींमध्ये समावेश आहे.

जोगेश्वरीच्या सात गोविंदांना दुखापत
ठाण्यातील दहीहंडीचा थरार अनुभवण्यासाठी मुंबईतून आलेल्या गोविंदांनाही दुखापतीला सामोरे जावे लागले. त्यामध्ये १५ मुंबईकर गोविंदांपैकी जोगेश्वरी परिसरातील सात गोविंदा जखमी झाले. त्यांना पाय, छाती, खांदा आणि गुडघ्याला दुखापत झाली.

पायाचे फ्रॅक्चर ते चक्कर, फिटपर्यंत...
जखमी गोविंदांमध्ये पायाचे फ्रॅक्चर, पाठीला, कमरेला, मानेला, डोक्याला, खांद्याला, हाताला, गुडघ्याला आणि छातीला दुखापत झाल्याची नोंद आहे. काहींना चक्कर आली, तर एका गोविंदाला फिट आल्याची नोंद आहे. मात्र बहुतांश दुखापती किरकोळ स्वरूपाच्या आहेत.

११ वर्षांच्या गोविंदापासून ६५ वर्षांच्या शेलारांपर्यंत...
यंदाच्या जखमींमध्ये सर्वात तरुण गोविंदा ११ वर्षांचा, तर सर्वाधिक वयाचे गोविंदा ६५ वर्षीय नंदकिशोर शेलार आहेत. त्यामुळे बालगोविंदांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटांचा सहभाग दिसून आला.

महिला गोविंदांना यंदा दुखापत नाही
यंदाच्या दहीहंडी उत्सवातील एक दिलासादायक बाब म्हणजे जखमी झालेल्या ५६ गोविंदांमध्ये एकाही महिला गोविंदाचा समावेश नाही. पुरुष गोविंदांना विविध दुखापती झाल्या असल्या तरी महिला गोविंदांपैकी एकालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली नाही.

दरवर्षीप्रमाणे यंदा ही ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात विशेष कक्ष तयार केला होता. दिवसभरात २२ जखमी गोविंदा दाखल झाले होते. त्यांच्यावर प्रथमोपचार करून घरी सोडण्यात आले.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे

रात्री उशिरापर्यंत ३४ जखमी गोंविंदांना उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यामधील दोन गोविंदांना डोक्याला मणक्याला गंभीर दुखापत झाल्याने मुंबईला हलविण्यात आले आहे. उर्वरित गोंविदांना प्रथमोपचार करून घरी सोडण्यात आले आहे. दहीकाला उत्सव लक्षात घेऊन विशेष कक्ष रुग्णालयात तयार केला होता.
- डॉ. अनिरुद्ध मालगावकर, वैद्यकीय अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय

वर्षनिहाय आकडेवारी
वर्ष जखमी गोविंदा
२०२६ ५६
२०२५ २७
२०२४ २२
२०२३ २३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक?; देशातील सर्व मत्र्यांचे मागवले वर्क बुक; उद्याच्या बैठकीत होणार झाडाझडती

Dial 112 False Alert : दारूच्या नशेत ‘डायल ११२’ वर खोटी माहिती; पोलिस पोहोचले अन् सापडली अवैध दारू, लोहारा पोलिसांत गुन्हा

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Marathi News Live Updates : अंतरवाली सराटीत OBC उपोषणासाठी स्टेजला पोलिसांचा नकार

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

SCROLL FOR NEXT