मुंबई

उलव्यात यमुना संस्थेची ५.५५ लाखांची दहीहंडी दणक्यात

CD

उलव्यात यमुना संस्थेची ५.५५ लाखांची दहीहंडी दणक्यात
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ६ : शेलघर येथील यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेची दहीहंडी धुमधडाक्यात साजरी झाली. आंतरराष्ट्रीय कामगार नेते व संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष महेंद्र घरत आणि सचिव शुभांगी घरत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उत्सवाने संपूर्ण उलवे परिसर दुमदुमून गेला होता. या सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव यांनी विशेष उपस्थिती लावली होती.
सायंकाळी ५ वाजता ढोल-ताशांच्या गजरात उत्सवाला सुरुवात झाली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उरण आणि पनवेल येथून आलेल्या सुमारे ६० हून अधिक गोविंदा पथकांनी एकापाठोपाठ एक सलामी दिली. चार, पाच, सहा, सात आणि तब्बल आठ थरांची यशस्वी रचना करत गोविंदांनी आपली शिस्त, चिकाटी आणि एकीचे दर्शन घडवले. भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाचा आनंद आणि दहीहंडीत महिला गोविंदा पथकांनी दिलेली लक्षवेधी सलामी, यामुळे उपस्थितांचा उत्साह द्विगुणित झाला. यासोबतच शिवमुद्रा डान्स अकॅडमीच्या नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. यावर्षीच्या उत्सवासाठी पाच लाख ५५ हजार ५०० रुपये रोख आणि चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती.
सायली संजीव यांनी गोविंदा पथकांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. महेंद्र घरत यांच्यासारखे दिलदार नेतृत्व आणि शुभांगी यांची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद आहे. आईच्या नावाने संस्था सुरू करून सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुखाचे क्षण पेरण्याचे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. महेंद्र घरत म्हणाले, आपली संस्कृती टिकवण्यासाठी आपण असे उत्सव साजरे करतो, मात्र उत्सव साजरा करताना कोणत्याही गोविंदाला दुखापत होणार नाही, याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. मी सदैव सर्वसामान्यांच्या आणि कलेच्या पाठीशी उभा राहीन, असे त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indapur Politics : इंदापुरात पुन्हा पाटील-गारटकर जवळ; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, हर्षवर्धन पाटील भाकरी फिरवणार?

Horoscope: तोंडावर साखरेसारखे गोड, पण माघारी करतात मोठा विश्वासघात! ‘या’ राशींच्या व्यक्तींचा असतो कपटी स्वभाव

Duleep Trophy Final : इशान किशनची फिफ्टी अन् प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी; तिलक वर्माच्या संघावर दडपण

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

SCROLL FOR NEXT