मुंबई

पनवेलच्या मानाच्या ‘देवांच्या हंड्या’;

CD

पनवेलच्या मानाच्या ‘देवांच्या हंड्या’
सुमारे ३०० वर्षांची परंपरा आजही कायम!
गोकुळाष्टमीला १० अधिष्ठानांचा अनोखा सोहळा; काठीने फोडल्या जातात हंड्या, ‘वारे’ आलेल्या भक्तांना कोरड्याचा प्रसाद
पनवेल, ता. ६ (बातमीदार) : आधुनिकतेच्या युगात दहीहंडीचे स्वरूप वेगाने बदलत असताना, पनवेल शहराने मात्र तब्बल २७८ वर्षांची पारंपरिक ‘देवांच्या हंड्यां’ची संस्कृती आजही अविरत जपली आहे. मानवी मनोरे रचण्याऐवजी ठरावीक उंचीवर टांगलेली हंडी काठीने फोडण्याची ही अनोखी पद्धत अनुभवण्यासाठी गोकुळाष्टमीच्या रात्री पनवेल शहरात भाविकांची प्रचंड गर्दी जमते.
पनवेलमधील लाइन आळी येथील वारेची दहीहंडी या पारंपरिक सोहळ्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. ‘वारे येणे’ म्हणजे भक्ताच्या अंगात भगवंताचा संचार होणे, अशी येथील श्रद्धा आहे. १० अधिष्ठानांतील मानकरी कुटुंबातील युवकांच्या अंगात श्रीकृष्णाचा संचार झाल्यानंतर ते एकत्र येतात आणि पारंपरिक पद्धतीने शहरातील मानाच्या हंड्या फोडतात. महाडिक, चव्हाण, दाभणे, जाधव, बापटवाडा, रामधरणे, धुमाळ, गावदेवी मंदिर आणि घरत आदी अधिष्ठानांच्या परंपरेला पनवेलच्या सांस्कृतिक इतिहासात विशेष स्थान आहे. गोकुळाष्टमीच्या दिवशी सर्व अधिष्ठानांची मंडळी नवनाथ मंदिरात पूजा-अर्चा करून सोहळ्याला सुरुवात करतात. रात्री १२ वाजून पाच मिनिटांनी मानाच्या हंड्या फोडण्यास प्रारंभ होतो. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या सोहळ्यातील चौथ्या पिढीतील युवकही आज तितक्याच श्रद्धेने सहभागी होत आहेत. त्यामुळे पनवेलच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणारी ही मानाची दहीहंडी आजही नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

कोड्याचे फटकारे ‘प्रसाद’ मानण्याची श्रद्धा
या सोहळ्यात ‘वारे’ आलेल्या भक्तांवर ज्येष्ठ नागरिकांकडून कोडे किंवा चाबकाचे फटकारे मारले जातात. हे फटकारे शिक्षा नसून भगवंताचा प्रसाद असल्याची येथील श्रद्धा आहे. वाद्यांच्या गजरात आणि जयघोषात हा अनोखा धार्मिक विधी पार पडतो. त्यानंतर काठीच्या सहाय्याने हंडी फोडली जाते. सर्व अधिष्ठानांच्या हंड्या फोडल्यानंतर बल्लाळेश्वर मंदिराच्या तुळशीघाटावर कोड्यांची रांग लावून त्यांची पूजा केली जाते. ‘गोपाळकाला गोड झाला, आमचा विठोबा घराशी आला’ असा जयघोष करत सोहळ्याची सांगता होते. त्यानंतर भाविकांसाठी विविध अधिष्ठानांमध्ये महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indapur Politics : इंदापुरात पुन्हा पाटील-गारटकर जवळ; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, हर्षवर्धन पाटील भाकरी फिरवणार?

Horoscope: तोंडावर साखरेसारखे गोड, पण माघारी करतात मोठा विश्वासघात! ‘या’ राशींच्या व्यक्तींचा असतो कपटी स्वभाव

Duleep Trophy Final : इशान किशनची फिफ्टी अन् प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी; तिलक वर्माच्या संघावर दडपण

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

SCROLL FOR NEXT