मुंबई

उल्हासनगरच्या आरोग्यसेवेला नवी ‘संजीवनी’

CD

उल्हासनगर, ता. ६ (वार्ताहर) : डॉक्टरांची कमतरता आणि अत्याधुनिक सुविधांच्या प्रतीक्षेत असलेल्या उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाला आता वैद्यकीय महाविद्यालयाचे ‘बळ’ मिळणार आहे. १४ तज्ज्ञांसह जवळपास १०० शिकाऊ डॉक्टर रुग्णालयात सेवा देणार आहेत. तसेच आयसीयू, एमआरआय आणि सीटीस्कॅनसारख्या सुविधांचाही मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे.

अंबरनाथ येथे दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे १४ तज्ज्ञ शिक्षक डॉक्टर आणि जवळपास १०० शिकाऊ डॉक्टर आता उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात सेवा देणार आहेत. माजी आमदार पप्पू कलानी यांच्या मध्यस्थीनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. अंबरनाथ वैद्यकीय महाविद्यालयाला उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालय, प्रसूती रुग्णालय, अंबरनाथचे छाया रुग्णालय आणि बदलापूर उपजिल्हा रुग्णालयातील बेडसंख्येच्या आधारे मान्यता मिळाली आहे; मात्र वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात सेवा देत असल्याची बाब आरोग्य सभापती सविता तोरणे आणि शिवाजी रगडे यांनी पप्पू कलानी यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता संजय वर्मा आणि जिल्हा शल्यचिकित्सक मनोहर बनसोडे यांच्यासोबत बैठक घेण्यात आली.

दोन्ही संस्थांमधील समन्वयाचा अभाव दूर करीत डॉक्टरांना मध्यवर्ती रुग्णालयात सेवा देण्यासाठी आवश्यक जागा निश्चित करण्यात आली. वैद्यकीय महाविद्यालयाकडे उपलब्ध निधीतून रुग्णालयात सुसज्ज आयसीयू, एमआरआय, सीटीस्कॅन तसेच लहान मुलांसाठी विशेष युनिट उभारण्याची तयारी वर्मा यांनी दर्शविली.

रुग्णांना दिलासा मिळणार
या सुविधा प्रत्यक्षात आल्यास गंभीर रुग्णांना कळवा किंवा मुंबईला पाठविण्याची गरज कमी होऊन उल्हासनगरमध्येच अत्याधुनिक उपचार उपलब्ध होतील, असा विश्वास पप्पू कलानी यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangare Patil Kunbi Certificate : विश्वास नांगरे -पाटील यांनी कुणबी दाखल्याचा वापर केला? अंतरवालीत ओबीसी आंदोलनात दावा; वातावरण तापलं

९ वर्षांच्या एकटेपणानंतर अपूर्वा नेमळेकरांनी सांगितली मनातली गोष्ट; दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताना म्हणाली...

Yoga For Everyone: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटांसाठी 'ही' आहेत सर्वोत्तम योगासने! आरोग्य अन् मानसिक शांतीची पक्की गॅरंटी...

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Indapur Politics : इंदापुरात पुन्हा पाटील-गारटकर जवळ; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, हर्षवर्धन पाटील भाकरी फिरवणार?

SCROLL FOR NEXT