मुंबई

रिंग मेट्रोविरोधातील लढा रस्त्यावर

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : प्रस्तावित अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोविरोधातील चळवळीने आता वेग घेतला आहे. ‘वेकअप ठाणेकर’ची हाक देत सुरू झालेले हे आंदोलन आता ‘ठाणे अगेन्स्ट इंटिग्रल रिंग मेट्रो’ या ठाम भूमिकेपर्यंत येऊन पोहोचले आहे. आपली ही भूमिका प्रशासनाच्या आणि सरकारच्या कानापर्यंत पोहोचवण्यासोबतच ठाणेकरांना जागृत करण्यासाठी विविध आघाड्यांवर मोहीम उभारण्यात आली आहे. गेल्या आठवडाभरापासून शहरात झळकणारे विरोधाचे बॅनर, स्वाक्षरी मोहीम राबवल्यानंतर आता सलग दुसऱ्या रविवारी आज (ता. ६) मानवी साखळी उभारून आंदोलन करण्यात आले.

१२ हजार कोटींपेक्षा जास्त बजेट असलेल्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोच्या मार्गावरील अडथळे दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसत आहे. या प्रकल्पासाठी निधी मंजूर झाला असून स्थानके, त्यांचा मार्ग याची आखणी करण्यात आली आहे; पण या मार्गामधील किती घरे विस्थापित होणार आहेत, त्यांचे पुनर्वसन कसे करणार आहे, यासह विविध प्रश्नांची उत्तरे हा प्रकल्प राबवणाऱ्या ‘महा मेट्रो’कडेसुद्धा नाही, याची पोलखोल दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत उघडकीस आली आहे. असे असतानाही हा प्रकल्प रेटून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भावना ठाणेकरांमध्ये वाढत चालली आहे.

ठाण्याला अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोची गरज नाही, हे ठामपणे सांगण्यासाठी रविवारी शेकडो ठाणेकर रस्त्यावर उतरले. पोखरण रोड क्रमांक दोनवरील स्वामी जंक्शन ते प्रशांत कॉर्नरदरम्यान नागरिकांनी मानवी साखळी करून प्रस्तावित मेट्रोविरोधात निदर्शने केली. गेल्या रविवारी स्वाक्षरी मोहिमेनंतर आज झालेल्या साखळी आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

आता विरोध प्रत्यक्ष रस्त्यावर
‘ठाणे अगेन्स्ट इंटिग्रल रिंग मेट्रो’च्या वतीने ॲड. राधिका राणे आणि आदेश मेहरोत्रा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पावसाची पर्वा न करता नागरिक, व्यावसायिक आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले. हातात फलक घेऊन तसेच घोषणाबाजी करीत नागरिकांनी प्रकल्पाला विरोध दर्शविला. शहरातील विविध रस्त्यांवर ‘अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो नको’ अशा आशयाचे बॅनर झळकत आहेत. त्यामुळे विरोध आता केवळ बैठका आणि निवेदनांपुरता न राहता प्रत्यक्ष रस्त्यावर येत असल्याचे चित्र आहे.

प्रकल्प न थांबवल्यास जनआंदोलन
ठाणेकरांच्या मूलभूत समस्या सोडविण्याऐवजी त्यांच्यावर हा अनावश्यक प्रकल्प लादला जात आहे. नागरिकांचा लोकशाही मार्गाने व्यक्त झालेला स्पष्ट विरोध प्रशासनाने लक्षात घेऊन प्रकल्पाचे काम तातडीने थांबवावे. प्रशासनाने नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात हे जनआंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा आदेश मेहरोत्रा यांनी दिला.

बेकायदा वृक्षतोडीवर पर्यावरणवाद्यांचा संताप
पर्यावरण कार्यकर्ते रोहित जोशी यांनी प्रशासनाच्या मनमानी कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. पालिका निवडणुकीनंतर वृक्ष प्राधिकरण समिती गठित झालेली नसताना, सर्वसाधारण सभेने ३,९०० झाडे तोडण्यास दिलेली मंजुरी बेकायदा आहे. या समितीत नागरिकांचे प्रतिनिधित्व नाही, त्यामुळे हा केवळ औपचारिकता पूर्ण करण्याचा दिखावा आहे. या बेकायदा वृक्षतोडीवर आक्षेप नोंदवला असूनही अद्यापि सुनावणीसाठी बोलावले गेलेले नाही. जर प्रशासनाने जनसुनावणीशिवाय एकाही झाडाला हात लावला, तर गेल्या सहा महिन्यांत दिलेल्या सर्व वृक्षतोडीच्या परवानग्यांना न्यायालयात आव्हान देणार, असा इशारा त्यांनी दिला आहे.

प्रमुख मागण्या
१. प्रस्तावित ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्प सध्याच्या स्वरूपात तत्काळ रद्द करा.
२. मेट्रो मार्गिका ४ आणि ५ आधी सुरू कराव्यात. प्रवाशांचा प्रतिसाद पाहूनच ठाण्यात दुसऱ्या मोठ्या मेट्रो प्रकल्पाचा विचार व्हावा.
३. मंजूर झालेल्या ३०३ पैकी केवळ १२३ इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात आल्या आहेत. उर्वरित १८० बस त्वरित खरेदी करून ठाण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी.
४. खड्डेमुक्त रस्ते आणि मोकळे पदपथ करून विकासाच्या नावाखाली होणारी वृक्ष आणि कांदळवनाची कत्तल थांबवावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangare Patil Kunbi Certificate : विश्वास नांगरे -पाटील यांनी कुणबी दाखल्याचा वापर केला? अंतरवालीत ओबीसी आंदोलनात दावा; वातावरण तापलं

९ वर्षांच्या एकटेपणानंतर अपूर्वा नेमळेकरांनी सांगितली मनातली गोष्ट; दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताना म्हणाली...

Yoga For Everyone: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटांसाठी 'ही' आहेत सर्वोत्तम योगासने! आरोग्य अन् मानसिक शांतीची पक्की गॅरंटी...

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Indapur Politics : इंदापुरात पुन्हा पाटील-गारटकर जवळ; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, हर्षवर्धन पाटील भाकरी फिरवणार?

SCROLL FOR NEXT