मुंबई

तृतीय पंथीयांचा हाती शहर स्वच्छतेची धुरा

CD

स्वच्छतेसाठी‘ती’ मैदानात
महिला, तृतीयपंथीयांच्या बचत गटांंवर जबाबदारी
वसई, ता.६ (बातमीदार)ः सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर दंड आकारण्यासाठी महिलासंह तृतीयपंथी नेमले जाणार आहेत. त्यामुळे वसई-विरार शहराच्या स्वच्छतेसाठी ‘ती’ मैदानात उतरणार आहे.
वसई-विरार शहरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होत आहे. अनेक भागांचे विद्रुपीकरण झाले आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा फेकणे, जाळण्याचे प्रकार वारंवार घडतात. त्यामुळे सामाजिक आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी बिट मार्शलही पालिकेने नियुक्त केले. परंतु, अस्वच्छतेचे प्रमाण कमी होत नसल्याने बिटमार्शल पदाची जबाबदारी महिला, तृतीय पंथीयांच्या बचत गटांना दिली जाणार आहेत.
---------------------
जबाबदारी काय
स्वच्छतेबाबत जनजागृती करणे, सार्वजनिक ठिकाणी पाहणी, नियमभंग घटनांची नोंद, अधिकाऱ्यांना अहवाल सादर करणे, दंडनीय कारवाई, घनकचरा व्यवस्थापनाचे नियम पालन करण्यास नागरीकांना प्रोत्साहित करणे.
--------------------
राज्यातील पहिला प्रयोग
आयुक्त पृथ्वीराज बी.पी.यांनी याबाबतचा प्रस्ताव महासभेपुढे सादर केला होता. त्याला मंजुरी देण्यात आल्याने वसई-विरारमध्ये राज्यातील पहिला प्रयोग होणार आहे. तसेच महिला सक्षमीकरणालाही पाठबळ मिळणार आहे.
--------
रोजगाराचे साधन
वसई-विरार शहर पालिकेने महिला, दिव्यांग, तृतीय पंथी बचत गटाची स्थापना केली आहे. सणासुदीला विविध वस्तू तयार करून विक्री केली जाते. या उपक्रमातून रोजगाराचे नवे साधन मिळाले आहे.
----------
वसई-विरार शहरात महिला, तृतीय पंथींयांचे बचत गट आहेत. त्यांना सन्मानाने रोजगार मिळावा, यासाठी शहर स्वच्छतेच्या उपक्रमात सामावून घेतले जाणार आहे.
-अजीव पाटील, महापौर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

Rural Protest: स्मशानभूमीचा रस्ता नसल्याने ग्रामपंचायतीसमोरच सरण; दिगर ग्रामस्थांचा संताप, प्रशासनाचे लेखी आश्वासन

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

Animal Welfare: सणांतील डीजे-फटाक्यांचा दणदणाट; मुक्या प्राण्यांमध्ये भीती, तणाव आणि कानाच्या विकारांच्या केसेसमध्ये ३०-४० टक्के वाढ

SCROLL FOR NEXT