मुंबई

विनापरवानगी स्वागत कमानी हटवा

CD

बदलापूर, ता. ६ (बातमीदार) : गणेशोत्सव; तसेच आगामी धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक रस्त्यांवर उभारण्यात येणाऱ्या मोठ्या स्वागत कमानी आणि प्रवेशद्वारांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा कमानींना परवानगी देऊ नये आणि विनापरवानगी उभारलेल्या कमानी तातडीने हटवाव्यात, अशी मागणी नगरसेवक तथा नियोजन व विकास समितीचे सभापती संभाजी शिंदे यांनी बदलापूर नगर परिषदेकडे केली आहे. याबाबत त्यांनी नगराध्यक्षांना निवेदन देत कठोर भूमिका मांडली आहे.
नवीन डी.पी. रोड-कात्रप परिसरातील मुख्य वाहतूक मार्गावर मोठ्या कमानी उभारल्यास रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहनचालकांना अडथळा निर्माण होऊ शकतो. रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने आणि अन्य अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना मार्ग काढताना अडचणी येऊ शकतात. यासाठी नगर परिषदेची स्पष्ट लेखी परवानगी नसताना कोणत्याही मंडळाने अथवा संस्थेने सार्वजनिक रस्त्यावर कमान उभारू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. विनापरवानगी किंवा नियमांचे उल्लंघन करून उभारलेल्या कमानी संबंधित आयोजकांकडून तातडीने हटवून घ्याव्यात. आवश्यक असल्यास नगर परिषदेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून त्या हटवाव्यात आणि त्यासाठी झालेला खर्च संबंधितांकडून वसूल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. उत्सव साजरे करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे; मात्र त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची वाहतूक, सुरक्षितता किंवा अत्यावश्यक सेवांचा मार्ग धोक्यात येता कामा नये, अशी भूमिका शिंदे यांनी मांडली.

संयुक्त पथक स्थापनेची मागणी
उत्सवकाळात अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग, अग्निशमन विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक स्थापन करून नियमित पाहणी करावी, अशी सूचनाही शिंदे यांनी केली. विद्युत तारा किंवा रोहित्रांजवळ असुरक्षित पद्धतीने उभारलेल्या कमानींबाबत वीज वितरण कंपनी आणि अग्निशमन विभागाच्या समन्वयाने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.


दरवर्षी उत्सवाच्या काळात कमानींबाबत स्वतंत्र तक्रारी करण्याची वेळ येऊ नये, यासाठी नगरपरिषदेने शहरव्यापी परिपत्रक काढून कमानी उभारण्याबाबत स्पष्ट नियम निश्चित करावेत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनाची माहिती पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन विभाग आणि संबंधित विभागांना देण्यात आली असून, केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल देण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक?; देशातील सर्व मत्र्यांचे मागवले वर्क बुक; उद्याच्या बैठकीत होणार झाडाझडती

Dial 112 False Alert : दारूच्या नशेत ‘डायल ११२’ वर खोटी माहिती; पोलिस पोहोचले अन् सापडली अवैध दारू, लोहारा पोलिसांत गुन्हा

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Marathi News Live Updates : अंतरवाली सराटीत OBC उपोषणासाठी स्टेजला पोलिसांचा नकार

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

SCROLL FOR NEXT